व्यवसाय अभ्यासासंदर्भातील जाचक अटी रद्द करा

महाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशनची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शासनाने काढलेल्या 27 नोव्हेंबर 2015 च्या शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करा, सेवा प्रवेश नियमावलीत व्यवसाय अभ्यासक्रमांचा समावेश करावा, तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.

शासनाकडून कोट्यवधी रुपये व्यवसाय शिक्षणासाठी जाहीर केले जातात. परंतु प्रत्यक्षात उच्च शिक्षणाच्या व्यावसाय शिक्षणावर हवा तसा खर्च केला जात नाही. आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. परंतु त्यावर शासनाकडून कोणतीच ठोस भूमिका जाहीर केली जात नाही.
-राजेंद्र सस्ते, अध्यक्ष, महाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशन

महाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशनतर्फे साने गुरुजी विद्यालय येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याला जिल्ह्यातून जवळपास सव्वादोनशे शिक्षक उपस्थिती होते. शासनाने व्यावसाय शिक्षणासाठी मोठ्या प्रमणात निधी मंजूर केला आहे. मात्र, प्रत्यक्षात निधी खर्च करताना काटकसर केली जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सस्ते म्हणाले, शासनाने इयत्ता अकरावी बारावीसाठी व्यवसाय अभ्यासक्रम नव्याने तयार केला आहे. मात्र, यासाठी लागणारी मशिनरी, सामुग्री मात्र शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना अडचणी येतात. परंतु शिक्षकांनी न शिकवल्यामुळे व्यवसाय शिक्षणात अपयश आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अभ्यासक्रम अद्ययावत होणे, सामग्री पुरवणे या गोष्टी शिक्षकांच्या हाती नसतात. त्याबरोबरच काही शिक्षकांना अत्यंत कमी मानधनावार काम करावे लागते. तर काही शासकीय व्यवसाय शिक्षण बंद करण्याच्याही मार्गावर शासन आहे, असे दिसते आहे. दरम्यान, राज्यात जवळपास सहाशे शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाचे धडे दिले जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)