वॉवरिन्का बचावला, मरेचे आव्हान संपुष्टात अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा

न्यूयॉर्क – स्टॅन वॉवरिन्काने असह्य उष्मा आणि युगो हम्बर्टची कडवी झुंज यावर मात करताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिस.ऱ्या फेरीत धडक मारली. मात्र माजी विम्बल्डन विजेत्या अँडी मरेचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. तसेच अग्रमानांकित राफेल नदाल, तृतीय मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रो, पाचवा मानांकित केविन अँडरसन, नववा मानांकित डॉमिनिक थिएम, 11वा मानांकित जॉन इस्नर आणि गुणवान युवा खेळाडू डेनिस शापोव्हालोव्ह या पुरुष मानांकितांनी वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे गेल्या वर्षी फ्रेंच ओपनपासून त्रस्त असलेल्या वॉवरिन्काला हम्बर्टवर मात करण्यासाठी 7-6, 4-6, 6-3, 7-5 अशी सुमारे साडेतीन तास कडवी झुंज द्यावी लागली. परंतु दुखापतीतून परतताना आपली वाटचाल समाधानकारकरीत्या सुरू असल्याचे वॉवरिन्काने नमूद केले. दरम्यान अँडी मरेला मात्र स्पेनच्या फर्नांडो वेर्दास्कोविरुद्ध 5-7, 6-2, 4-6, 4-6 असा पराभ” पत्करावा लागल्यामुळे आणखी एका ग्रॅंड स्लॅममध्ये मरेच्या पदरी अपयश जमा झाले.
डेल पोट्रोने अमेरिकेच्या डेनिस कुडलाचा 6-3, 6-1, 7-6 असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. तर रशियाच्या डॅनिस मेदवेदेव्हने 15व्या मानांकित स्टेफानोस सित्सिपासवर 6-4, 6-3, 4-6, 6-3 अशी मात करताना सनसनाटी विजयाची नोंद केली. पाचव्या मानांकित अँडरसनने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीचा 6-2, 6-4, 6-4 असा झटपट पराभव केला. मात्र नवव्या मानांकित थिएमला स्टीव्ह जॉन्सनला नमविण्यासाठी 6-7, 6-3, 5-7, 6-4, 6-1 अशी कडवी झुंज द्यावी लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)