वैशाखखेडे येथे पारंपरिक पद्धतीने निसर्गपूजन

  • नागरिकांनी घेतला पुरी-गुळवणी व कांद्याच्या चटणीचा आस्वाद
  • आषाढातील शेवटच्या मंळवारी ग्रामदैवताची पूजा

आळेफाटा – निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वैशाखखेडे (ता. जुन्नर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरुपारंपरिक पद्धतीने निसर्गपूजन केले जाते. यानिमित्ताने मंगळवारी (दि. 30) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित भाविकांनी निसर्गाच्या सान्निध्यात पुरी-गुळवणी व कांद्याच्या चटणी असा वनभोजनाचा अस्वाद घेतला.
गेल्या अनेक वर्षांपासून जुन्नर तालुक्‍यातील वैशाखखेडे ग्रामस्थांच्या वतीने निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ महिन्यातील शेवटच्या मंगळवारी निसर्गपूजन व ग्रामदैवत पद्मावतीमातेची पूजा करण्याची परंपरा आहेम मंगळवारी (दि. 30) यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच ग्रामपंचायत सदस्या मीना शेटे, अलका टाकळकर, मीना शेटे, अस्मिता शेटे. प्रतीक्षा शेटे या महिलांच्या हस्ते कुकडी नदीचे जलपूजन आणि ग्रामदैवत पद्मावती देवीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी कलगी-तुऱ्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने पिंपळवंडी आणि पंचक्रोशीतील उपस्थित भाविकांनी पुरी गुळवणी आणि कांद्याची चटणीचा अस्वाद घेतला. यावेळी अमित बेनके यांनी निसर्गपुजन व वनभोजनचा हा उपक्रम चांगला उपक्रम असून या निमित्ताने ग्रामस्थांमधून एकात्मतेची भावना निर्माण होत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पिराजी टाकळकर, सोसायटीचे संचालक रघुनाथ टाकळकर, दत्ता टाकळकर, पी. के. कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान काकडे, सतीश काकडे विकास भांगरे,अरुण शेटे, सुभाष शेटे, सोमनाथ फुलसुंदर, संजय भुजबळ, अजित वाघ उपस्थित होते.

वैशाखेडे येथे गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरूअसून निसर्ग पूजन करणारे वैशाखखेडे हे जुन्नर तालुक्‍यातील एकमेव गाव आहे.
– शरदराव लेंडे, जिल्हा परिषदेचे गटनेते

Leave A Reply

Your email address will not be published.