वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे दोन पदक निश्‍चीत 

सायना आणि सिंधु यांची उपान्त्य फेरीत धडक 
जकार्ता: रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेती सायना नेहवाल या भारतीय खेळाडूंनी आपपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ गेममध्ये मात करताना आशियाई क्रीडास्पर्धेतील महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली असून स्पर्धेत भारताची दोन पदक निश्‍चीत झाली आहेत.
भारताच्या सायना नेहवालने थायलंडच्या रात्चनोक इंटानोन हिच्यावर 21-18, 21-16 अशी मात केली. त्यामुळे सायना पदकाच्या शर्यतीत दाखल असून भारताचे किमान कांस्यपदक निश्‍चित झाले आहे. सायनापाठोपाठ भारताच्या सिंधूने थायलंडच्या जिंदापॉलवर 21-11, 16-21, 21-14 अशी मात केली. त्यामुळे सिंधूही पदकाच्या शर्यतीत दाखल झाली असून भारताला 2 पदकांची कमाई करता येऊ शकते. यामुळे या स्पर्धेच्या बॅडमिंटन क्रिडाप्रकारातील 36 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपणार आहे.
आशियाईस्पर्धेत भारताने आतापर्यंत आठवेळा पदकाची कमाई केलेली असून त्यात सर्वाधिक सहा वेळा सांघिक प्रकारात भारताने पदक आणले होते तर एकवेळ पुरुष दुहेरीत आणि केवळ 1982 साली एकेरीत सईद मोदीयांनी एकमेव पदक जिंकले होते त्यामुळे या दोघींच्या या कामगिरीने एकेरीतील पदकाचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर आहे.
उपान्तय सामन्यात सिंधुचा सामना जागतीक क्रमवारित दुसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या अकेना यामागुचीसोबत असेल किंवा चीनच्या चेन युफेइसोबत असणार आहे तर सायनाचा सामना जागतीक क्रमवारित पहिल्या स्थानी असलेल्या चायनिज तैपेइच्या ताई त्झु यिंगशी होणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)