वैभव राऊतसह इतर आरोपींचा सनातनशी संबंध नाही

मुंबई – नालासोपारा स्फोटकेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह अन्य नऊ आरोपींचा सनातन संस्थेशी कोणताही संबंध नाही, असा दावा संस्थेने केला आहे. सनातन संस्थेचे प्रवक्ता चेतन राजहंस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला.

सनातनवर खोटे आरोप करण्यात आले आहेत, असे सनातनचे म्हणणे आहे. मराठा आंदोलन आणि ईदमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा सनातनचा कोणताही हेतू नसल्याचे सांगत एटीएसचे सर्व आरोप सनातनतर्फे फेटाळण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नालासोपारा येथून वैभव राऊत याला स्फोटकांसह अटक करण्यात आली. त्याचे साथीदार सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपावरून अटक करण्यात आली. या सर्वांचा संबंध सनातन संस्थेशी जोडून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सनातनने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

वैभव राऊत आणि अन्य कोणताही आरोपी सनातनचा कधीही साधक नव्हता, असा दावा राजहंस यांनी केला. तपासात सनातनचे नाव कुठेही आलेले नाही. प्रसारमाध्यमे सनातनविषयी खोट्या बातम्या पसरवतात, अशा खोट्या बातम्या देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही सनातनने केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून संस्थेला बदनाम करण्यात येते, असा आरोपही सनातनने केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)