वैचारिक क्षमता गमावलेल्यांना हद्दपार करा

पिंपरी – देशात द्वेषाचे, मतभेदाच्या राजकारणाबरोबरच आर्थिक व राजकीय सत्ता एकवटण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परिणामी देशातील जनतेच्या मनात कमालीचा राग व चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे वैचारिक क्षमता गमावलेल्या केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांना कायमचे हद्दपार करा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पिंपरीतील एच. ए. मैदानावर सोमवारी (दि. 28) “वंचित बहुजन आघाडी’चा सत्ता संपादन निर्धार मेळावा व महाअधिवेशन पार पडले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. आंबेडकर बोलत होते. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला शहराध्यक्षा लता रोकडे, अकील मुजावर, आनंदा कुदळे, नाथन केंगार, अंकुश कानडी आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेससोबतच्या आघाडीचा संदर्भ देत, ऍड. आंबेडकर म्हणाले की, भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचे ठरल्यांतर आपण लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल चर्चा करुयात. मात्र यावर कॉंग्रेस आणि आमचे एकमत होत नाही. तर आज देशात दोन समांतर सरकार चालत आहेत. एक संविधानाअंतर्गत राष्ट्रपती चालवत असून त्याला समांतर सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत आहे. पुण्यातील एल्गार परिषेदमध्ये सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल केले. पण, भाजपच्या डोंबवलीतील पदाधिकाऱ्याच्या घरी घातक शस्त्रे सापडली. ती कशासाठी साठवली होती. ते भाजपने जाहीर करावे. आता त्यामुळे देशात सर्वात सुरक्षित संघ आहे. दलिताकडे पुस्तके सापडली तर तो नक्षलवादी तर मुसलमानाकडे शस्त्र सापडली तर त्याला दहशतवादी ठरविले जाते. तर मग आरएसएसच्या डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्याकडे शस्त्र सापडली तर तो दहशतवादी का नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्यातील कुपोषणाबाबत ते म्हणाले की, कुपोषणाचा विषय आली की नंदूरबार, मेळघाट, गडचिरोलीची आकडेवारी पुढे केली जाते. मात्र, सत्तेचे माहेरघर व जाणत्या राजाचा जिल्हा असलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ, आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासींच्या कुपोषणाची आकडेवारी कधीच समोर येत नाही. या माहेरघरात कुपोषणाने किती बालके दगावतात, त्याची चर्चा देखील होत नाही. त्यामुळे आदिवासींचे अद्यापही कुपोषण थांबलेले नाही, याकडे आंबेडकरांनी लक्ष वेधले. एसआरएच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी नावाखाली नवीन खुराडी बांधायला सुरुवात केली आहे. झोपडपट्ट्या उठवून त्या जागा बिल्डरांचा घशात जागा घातल्या जात आहेत. गरिबाला गरिब करायचे आणि श्रीमंताला अधिक श्रीमंत करायचे आहे असे सरकारचे धोरण आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी बिल्डरांची व डेव्हलर्सची पार्टी आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आमदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात समाजातील दलाली करणाऱ्यांवर टीका केली. याच दलालांमुळे समाजाला सत्तोपासून वंचित रहावे लागले आहे. अशा मूठभर दलालांना बाजूला सारण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.

या कार्यक्रमात अनिल जाधव, महेंद्र सिंग, अरूण चाबुकस्वार, राजकुमार परदेशी यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला.

अजानच्यावेळी भाषण थांबविले
बारा बलुतेदार संघटनेचे प्रताप गुरव यांचे भाषण सायंकाळी साडे सहाच्या सुमारास संपल्यानंतर व्यासपीठावर अकील मुजावर मनोगत व्यक्‍त करण्यासाठी आले. त्यावेळी मशिदीमधून अजानची बांग ऐकू आली. त्यामुळे ही नमाज अदा होईपर्यंत मुजावर यांनी आपले भाषण थांबविले. यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने देखील शांतता पाळत सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)