वैकुंठ स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य

स्थायी समितीमध्ये प्रशासन धारेवर : लाखोंचा देखभाल खर्च पाण्यात

पुणे – शहरातील महापालिकेची प्रमुख स्मशानभूमी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्मशानभूमीच्या स्वच्छता व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असतानाही या ठिकाणी चिखल, साचलेला कचरा, तसेच ड्रेनेज वाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, या दूरवस्थेवरून मंगळवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रशासनावर चांगलेच धारेवर धरण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागपुरे म्हणाल्या, स्मशानभूमीत लाकडं वाहण्यासाठी ज्या गाड्या आहेत त्यांच्या चाकांची स्थिती अत्यंत खराब झाली असून गंजलेल्या त्या चाकांना लाकडांचे वजन देखील पेलवत नाही. रुग्णवाहिकेची सेवा मिळण्यास नेहमीच विलंब होतो. शहरातील लोकसंख्या पाहाता स्मशानभूमीत उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या अगदीच अत्यल्प आहे. यामध्ये तातडीने वाढ करण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर पालिका कर्मचारी व ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय असणे देखील गरजेचे वाटते.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता जाणवते आणि याच अस्वच्छ ठिकाणी माल वाहतुकीच्या गाड्या ठेवल्या जातात. याठिकाणी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह देखील दोन-तीन वर्षांपासून निकामी आहे. त्याची देखील स्वच्छता करण्याची जोखीम कर्मचारी किंवा ठेकेदार उचलताना दिसत नाहीत. मृतव्यक्तीचे कुटुंब अगोदरच वेगळ्या विचारात असतं आणि त्यात अशा गोष्टींचा सामना करावा लागल्यास ते अधिक वेदनादायी ठरतं. त्यामुळे या सर्वगोष्टींची पालिका प्रशासनाने तातडीने शहानिशा करावी व शक्‍य तितक्‍या लवकर त्याठिकाणची परिस्थिती बदलण्यासाठी निर्णय घ्यावेत, अशी मागणीही नागपुरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)