वेस्ट इंडिजचा मालिका विजय !

नॉर्थ साउंड: केमार रोच आणि जेसन होल्डर यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंड विरुद्धची दुसरी कसोटी 10 गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव केवळ 187 धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 306 धावांची मजल मारत इंग्लंडवर पहिल्या डावात 119 धावांची आघाडी घेतली. मात्र, पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यातच इंग्लंडची दमछाक झाल्याने त्यांचा दुसरा डाव केवल 132 धावांमध्येच आटोपल्याने ते वेस्ट इंडीजसामोर केवळ 14 धावांचे लक्ष्य देऊ शकले. हे किरकोळ लक्ष्य वेस्ट इंडिजने एकही गडी न गमावता पार करत दुसरा सामना आपल्या नावे केला. दोन्ही डावात मिळून आठ बाळी घेणारा केमार रोच सामनावीर ठरला.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नेणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. वेस्ट इंडिजचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लडचे अवस्था 4-55 अशी केली. त्यानंतर काही काळ जॉनी बेअरस्टोने त्याचा डाव सावरला पण त्याला 52 धावांवर केमार रोचने पायचीत केल्याने इंग्लडला मोठा धक्का बसला. त्यानंतर मोईन अली आणि बेन फोक्‍स यांनी संयमी फलंदाजी करत इंग्लडला 150 पल्ला गाठून दिला. ते दोघे बाद झाल्यावर इंग्लडचा संपूर्ण डाव 187 मध्येच आटोपला.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद 306 धावा करत 119 धावांची आघाडी मिळवली. त्यात क्रेग ब्रेथवेट 49 धावा , जॉन कॅम्पबेल 47, शाई होप 44 आणि डॅरेन ब्रावो 50 धावांच्या खेळी करत वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, मधल्याफळीतील गोलंदाजांनी निराशा केल्याने त्यांचा डाव 306 धावावरच संपला.

दुसऱ्या डावात फलंदाजीस आलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. परंतु, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर ते बाद झाले. त्यानंतर कर्णधार जो रूटही 7 धावांवर झेल बाद झाला. पहिल्या डावात 60 धावा करणाऱ्या मोईन अलीचा अडथळा केमार रोचने दूर केला. त्याला केवळ 4 धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडचे तळाचे फलंदाज फार धावा जोडू शकले नाहीत. इंग्लंडचा दुसरा डाव 132 धावांवर संपुष्टात आला. केमार रोचने पहिल्या डावा प्रामाणेच दुसऱ्या डावातही इंग्लंडचे चार बळी घेतले. तर त्याला जेसन होल्डरने 4 बळी घेत सुरेख साथ दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)