वेळे येथे तिहेरी अपघात

भुईंज, दि. 26 (प्रतिनिधी) – पुणे सातारा महामार्गा वरील वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटाच्या पायथ्याला उतारा वरुनभरघाव वेगात आलेल्या एका ट्रॅक्‍टर वाहतूक करणाऱ्या ट्रेलरने पुढच्या दोन कंटेनरला जोराची धडक दिली. या तिहेरी अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पोलिसांनी उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, अपघात करणारा चालक वाहनासह पळुन जाण्यास यशस्वी झाला आहे.

अधिक माहिती अशी, पुणे सातारा महामार्गा वरील वेळे गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटाच्या तिर्व उताराने एम एच 12 एमबी 3404 ही ट्रॉली सहा ट्रॅक्‍टर घेऊन दोन नंबर लेन वरुन सुसाट नाग मोडी वळने घेत जात असताना त्यावरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने तिन नंबर लेन वरुन जाणारा एम एच 04 एफजे 9605 या कंटेनरला पाठी मागून जोराची धडक दिली या धडकेने तो पुढे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनर क्र. केए 01 एजी 7707 वर जाऊन जोरात आदळला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या धडकेत केबीन पुर्णपणे चेपल्याने त्यात असलेला क्‍लिनर (नाव समजु शकले नाही) आतच अडकून गंभीर जखमी झाला. त्यास भुईंज पोलिस आणि वेळे गावच्या रेस्क्‍यु टिमने कटरच्या साहाय्याने पत्रे कापुन तब्बल एक तासानंतर बाहेर काढले. त्यानंतर त्याला सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारासह घडला. अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस ट्रॅक्‍टर घेऊन पळून गेलेल्या चालकाचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)