वेलस्पन कॉर्पोरेशन व जीएसके कंझुमर हेल्थ

वेलस्पन कॉर्पोरेशन ही कंपनी मिडकॅप या सदरात मोडत असून ही कंपनी पाईप लाईनची कामं करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. जगभरातून अनेक कंपन्यांची कंत्राटं या कंपनीकडं आहेत, ज्याची किंमत सुमारे 12000 कोटी रूपयांच्या घरात आहे. नुकत्याच, अमेरिकेतील एका तेल व वायू प्रोजेक्‍टसाठी पाईप लाईन टाकण्याच्या कामासाठी या कंपनीस करारबद्ध केलं गेलं. या बातमीमुळं या कंपनीचा शेअर मागील आठवड्यात 28 टक्के उसळला. (126 रुपयांवरून 162 रु.) परंतु, ही जरी बातमी 23 ऑगस्ट रोजी आली तरी, दैनिक आलेखावर आपल्या 5/20 या मूव्हिंग अॅव्हरेज या अभ्यासानुसार 26 जुलैलाच 127 रुपयांवर पॉझिटिव्ह ब्रेकआऊट दिलेलं होतं).

दुसरा शेअर आहे जीएसके कंझुमर हेल्थकेअर. या कंपनीची उत्पादनं सर्वांच्याच परिचयाची आहेत परंतु ही कंपनी गुंतवणूकदारांकडून थोडीशी दुर्लक्षित अशी राहिलीय. बूस्ट, माल्टोव्ह व हॉर्लिक्‍स यासारखी हेल्दी ड्रिंक्‍स, क्रोसीन, इनो, आयोडेक्‍स,सेन्सॉडाईन टूथ पेस्ट, इ. उत्पादनं आपल्या रोजच्या परिचयातील आहेतच व यां व्यतिरिक्त कंपनी अनेक औषधं व इंजेक्‍शनं देखील बनवते. तर अशा या कंपनीच्या संदर्भात 4 बिलियन अमेरिकी डॉलर्सची बोली लावली जाण्याची शक्‍यता वर्तवली गेल्यानं या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात रु. 6691 वरून 7700 रुपयांपर्यंत वधारले. आता वर उल्लेखिलेल्या अभ्यासाधारे 17 जुलैलाच या शेअर्सच्या भावानं दैनिक तक्त्‌यावर रु. 6395 वर पॉझिटिव्ह ब्रेकआऊट दिलेला होता. एकूणच मागील आठवड्यात, औषधं बनवणाऱ्या कंपन्यांचाच बाजारात वरचष्मा राहिला होता. (कॅडीला 11.41% वाढ, डिवीज लॅब 11.11 %, तर ग्लेनमार्क 10% वाढ. या सर्व कंपन्यांनी अनुक्रमे 21 ऑगस्ट, 4 जुलै व 30 जुलैला पॉझिटिव्ह ब्रेकआऊट दिलेलं होतं.)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)