वेण्णानागर-वेळेकामथी रस्त्याच्या उद्या भूमिपूजन

सातारा- वेण्णानागर ते वेळेकामकामथी रस्त्यासाठी 4 कोटी 92 लाख मंजूर झाले असून त्याचा भूमिपूजन कार्यक्रम वेण्णानागर येथे दि. 29 रोजी सायंकाळी 6 वा.आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य प्रतीक कदम राहणार आहेत.

जिल्हा परिषद व जिल्हा नियोजनाच्या समितीच्या फांडातून चोरगेवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीसाठी 10 लाख मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, अंगणवाडीसमोर पेवर्स ब्लॉक बसवण्यासाठी 2 लाख मंजूर करण्यात आले आहे. आगुंडेवाडी येथील स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी 4 लाख मंजूर झाले असून घाटाईचा माळ येथे वळण बंधारा बांधण्यासाठी 10.44 लाख एवढे मंजूर करण्यात आले आहे. आहिरेवाडी येथेही संरक्षक भिंतीसाठी 3 लाख मंजूर करण्यात आले आहेत. वेण्णानागर – साबळेवाडी येथील भूमिपूजनानंतर कण्हेर येथे सायंकाळी 6.30 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सयोजकांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)