वृद्धांवरील अत्याचारांबाबत रांगोळीतून जनजागृती

80 फुटांची रांगोळी

पुणे – “आयुष्याने दिले आम्हाला मरणाच्या दाढेत ढकलून, आमचीच मुले म्हणायचो! त्यांनीही दिले हाकलून,’ 80 फुटांची भव्य आणि नेत्रदीपक रांगोळीतून रेखाटलेल्या या संदेशाद्वारे राष्ट्रीय कला अकादमीतर्फे यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत वृद्धांवर होणारे अत्याचार थांबविण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या वैविध्यपूर्ण आणि भव्य अशा रांगोळीतून सामाजिक विषयांवर जानजागृती करण्यासाठी लोकप्रिय असणाऱ्या अकादमीतर्फे गेली 20 वर्षे विसर्जन मिरवणुकीत रांगोळ्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात येते. अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री सक्षमीकरण, स्त्री-भ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, वाहतुकीची समस्या, पर्यावरण अशा अनेक विषयांवर संस्थेने रांगोळीच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे.

यंदा वृद्धांवरील अत्याचार या विषयावर संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा चौक ते अलका चौकापर्यंत 11 मोठ्या रांगोळ्या आणि त्यांना जोडणारी अखंड पायघडी यांच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाते. याबाबत संस्थेचे अक्षय शहापूरकर म्हणाले, “या उपक्रमास 25 पोते म्हणजेच 1,250 किलो रांगोळी (एका पोत्यात 50 किलो) आणि 600 किलो रंग वापरण्यात आलेले आहेत. तब्बल 300 कलावंतांनी या उपक्रमात सहभागी होत बाप्पांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली.’

हरे कृष्ण ग्रुपच्या वतीने टिळक रस्त्यावरील हत्ती गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपुढे रांगोळी काढली जाते. यंदादेखील ग्रुपच्या सुमारे 22 जणांनी या उपक्रमात सहभागी होत, रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छ भारत, स्त्री भ्रूण हत्या, शिक्षण जागृती, पाणी वाचवा, बेटी बचाव, पर्यावरण वाचवा याबाबत जनजागृतीपर संदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)