वृक्षारोपण ही काळाची गरज – बी. टी. लावंड

वाघोली- वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी केले .वाडेबोल्हाई – वाडेगाव (ता. हवेली) या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बी. टी. लावंड बोलत होते. यावेळी वाडेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावंड यांच्या हस्ते वड, पिंपळ, चिंच, लिंब आदी वृक्षे लावण्यात आली. दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून, मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. दुष्काळ निवारण आणि महाराष्ट्राचा समृध्द शाश्वत विकास करण्यासाठी वनलागवडीचे क्षेत्र वाढविणे गरजेचे असल्याचे मत लावंड यांनी व्यक्त केले. यावेळी पुणे शहर उपनिबंधक शहाजी हिरे, शिरसवडीचे माजी सरपंच संदीप गोते, वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे, माजी उपसरपंच संजय भोरडे, हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य प्रमोद गावडे, विठ्ठल गावडे, ज्ञानेश्वर गावडे, ग्रामपंचायत सदस्य सुरज भोरडे, शिरसवडीचे उपसरपंच बाळासाहेब गावडे, नितीन गावडे, सतीश नागवडे, संजय चव्हाण, बाळूराम गोते, मुकिंदा शिंदे, संजय पायगुडे, शिवाजी इंगळे, दशरथ गोते, रमेश गावडे, अंकुश गावडे, शरद इंगळे, अनिल वारघडे, दीपक शिंदे, राहुल शिंदे, दादा इंगळे सुनील गावडे, नितीन गावडे, गोरख वाघले, धनंजय कदम, जगन्नाथ ढवळे, सचिन ईवरे, गोपीनाथ इंगळे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)