वृक्षलागवडी बरोबरच त्याचे संगोपन महत्त्वाचे – संदिप कटके

गराडे – गेल्या काही वर्षांत वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम सामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे, त्यामुळे वृक्षलागवड करून त्याची जोपासना करणे काळाची गरज आहे असे मार्गदर्शन भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप कटके यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चा भिवरी (ता. पुरंदर) यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विकास कटके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना 150 सीताफळाची रोपे आणि खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच भरत गायकवाड, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गुलाब घिसरे, माजी सरपंच तुकाराम कटके, शेखर पिसे, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अविनाश कटके, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल कटके, योगेश कटके, मनोज वाडकर, उपशिक्षक रोहिदास राणे, रूपाली जगदाळे आणि ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा भिवरी यांच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन स्वाती दुर्गाडे यांनी केले, तर रेश्‍मा पोमण यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)