वृक्षलागवडीसाठी 35 लाख 40 हजार रोपेः गायकर

संगमनेर – पावसाळ्यात वनविभागाने शासकिय उद्दिष्टाप्रमाणे हाती घेतलेल्या 10 लाख 57 हजार 235 वृक्षलागवडीसाठी संगमनेर उपवन विभागातील 11 वनरोप वाटीकांमध्ये 35 लाख 40 हजार रोपे तयार असल्याची माहिती उपविभागीय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर यांनी दिली.
संगमनेर तालुक्‍यातील उपविभागीय वनक्षेत्रातील कोठे बुद्रूक, संगमनेर खुर्द, निंबाळे, चंदनापुरी, पिंपळगाव कोंझीरा, कौठे मलकापूर या सहा वनरोपवाटिकेत यावर्षी 35 लाख 40 हजार रोपे तयार आहेत. यापैकी 17 लाख 7 हजार रोपे लागवडी योग्य आहेत. या ठिकाणी शिशु, कडूनिंब, वड, पिंपळ, उंबर, आवळा, खैर, वावळा, जांभुळ, बेल, आवळा, बांबु, सिताफळ इत्यादी प्रकारची रोपे तयार करण्यात आली आहेत. यापैकी कोठे खुर्द येथील सर्वे नंबर 107 मधील 3.40 हेक्‍टर क्षेत्रात 3 लाख 50 हजार रोपे तयार आहेत. घारगाव वनपरिमंडळातील नांदुर खंदरमाळ, कुरकुंडी, भोजदरी, वनकुटे, खांडगेदरा ( कोठे खुर्द ) येथील वनक्षेत्रात 55 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. इतर रोपे शासनाचे विविध विभाग, संस्था, सहकारी संस्था, शासकिय कार्यालये, शेतकरी व ग्रामपंचायतीला पुरविण्यात येणार आहेत.
संगमनेर उपवनविभागात राज्य शासनाच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत 2016 च्या पावसाळ्यातील दोन कोटी वृक्षारोपण उद्दीष्टांतर्गत दोन कोटी 86 लाख वृक्षलागवड करण्यात आली होती. तर 2017 च्या मोहिमेतील सात कोटी उद्दीष्टापैकी पाच कोटी 43 लाख वृक्षारोपण करण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)