वीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानदेव वचकल

परिंचे- श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची माळ ज्ञानदेव (माऊली) कोंडिंबा वचकल यांच्या गळ्यात पडली. शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते. सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. ज्ञानदेव वचकल आणि लालासाहेब धुमाळ यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. या लढतीत ज्ञानदेव वचकल यांना 1073 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धा लालासाहेब धुमाळ यांना 1050 मते मिळाली. 23 मतांनी वचकल यांचा विजय झाला.
सदस्यपदाच्या 15 जागा असून निवडणुकीपुर्वी गणेश शशिकांत गुळदगड, गणेश ज्ञानोबा वाघ, रोहिणी योगेश खोमणे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरीत 12 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये आत्माराम तुकाराम समगीर, आशा अशोक सोनवणे, सीता अमोल धुमाळ, ऋषीकेश बाळासाहेब धसाडे, विनोद कृष्णाजी चवरे, ज्योती भीमाजी चवरे, योगेश विश्वासराव धुमाळ, माधुरी भूषण तांदळे, सुनीता राजेंद्र धसाडे, सोनाली विजय कुदळे, नवनाथ चंद्रकांत माळवे, सारिका मनोज धुमाळ हे उमेदवार सदस्य पदाच्या निवडणुकीत निवडून आले.
ज्ञानदेव वचकल हे नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक असून देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष आहेत. माळवाडी वीर यांचा भक्कम पाठिंबा घेऊन ही निवडणूक त्यांनी लढली असून परिसरातील शेतकऱ्यांशी असलेला संपर्क आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यावर निवडून आल्याचे ज्ञानदेव वचकल यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)