‘वीरे दी वेडिंग’चा ट्रेलर लॉन्च…

करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तैमूरच्या जन्मानंतर प्रदर्शित होणारा करीना कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे. सिनेमाचा ट्रेलर 2 मिनिट 49 सेकंदाचा आहे. शहरातील मुलींच्या गोष्टीवर हा सिनेमा बेतला आहे. चित्रपटाच्या नावावरुनच समजतं की, ही कहाणी लग्न आणि त्याच्या तयारीची आहे.

चित्रपटात चार मुलींची गोष्ट आहे. चारही जणींची गोष्ट वेगवेगळी आहे. लग्न, नवरा आणि समाजाबाबत त्यांचा स्वत:चा विचार आहे. नवऱ्यासोबतचे नाते, काम, पुरुष, वैवाहिक आयुष्य, कुटुंब आणि समाज हे चार मुलींच्या दृष्टीतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शशांक घोषने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रेहा कपूर आणि एकता कपूरने याची निर्मिती केली आहे. हा सिनेमा 1 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)