“वीरम’च्या हिंदी रीमेकमध्ये विकी कौशल

बॉलीवूडमध्ये अभिनेता विकी कौशल याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. चित्रपटसृष्टीत आता त्याला हमखास यश मिळविणा-या अभिनेत्यांपैकी मानले जात आहे. यावर्षी प्रदर्शित झालेला त्याचा “उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट सुपर हिट ठरला होता. आता तो परत एकदा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.

विकी कौशल हा तमिळ चित्रपट असलेल्या “वीरम’च्या हिंदी रीमेकमध्ये काम करणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे हिंदीत “लॅड ऑफ लुंगी’ असे नाव असणार आहे. हा चित्रपट साजिद नाडियाडवाला प्रड्यूस करणार असून डायरेक्‍शन फरहद सामजी करणार आहेत.

या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आधी अक्षय कुमार याचे नाव आघाडीवर होते. याबाबत साजिदशी अक्षयची चर्चा देखील झाली होती. पण शुटिंगच्या डेट्‌स जुळत नसल्याने अक्षयने चित्रपटाला नकार दर्शविला होता. आता अक्षयच्या जागी विकी कौशलला सजेस्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, विकी कौशलकडे शहीद उधम सिंह यांच्या बायॉपिकशिवाय करण जोहर याच्या मल्टी-स्टारर “तख्त’ चित्रपटाचे काम सुरू आहे. तसेच विकी एका हॉरर चित्रपटातही व्यस्त आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.