वीटभट्टी, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिकवा

शोभा खंदारे ः “आशा’ प्रकल्पाद्वारे “शिक्षक कार्यशाळा’ उत्साहात

नीरा- ऊसतोडणी, वीटभट्टी व दगडखाण कामगारांना पोटासाठी सहा-सात महिने स्थलांतर करावे लागते. कुठल्याही सोयीसुविधा, सुरक्षा नसताना ते जगतात. त्यांच्याप्रती आपण संवेदनशील असलो तरच त्यांची मुले शाळेत आणू शकतो. या पालकांची मने जिंका. मुलांना शाळेत घेऊन या, टिकवा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या. ती पूर्णपणे आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विद्या प्राधिकरणच्या (एससीईआरटी) उपसंचालक शोभा खंदारे यांनी केले.
शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट्‌स व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ऊसतोड मजुरांची मुले नजीकच्या शाळात दाखल करण्यासाठी “आशा’ प्रकल्प चालविला जातो. प्रकल्पाच्या वतीने बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण या चार तालुक्‍यातील 86 शाळांच्या शिक्षकांसाठी नीरा (ता. पुरंदर) नजीक पाडेगाव येथील समता आश्रमशाळेत ‘शिक्षक संवाद कार्यशाळा’ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (निरंतर) अण्णासाहेब मगदूम उपस्थित होते. याप्रसंगी एससीईआरटीच्या अनुराधा चव्हाण, विस्तार अधिकारी अनिल जगदाळे, संजय गायकवाड, सतीश कुदळे, रमेश जरांडे, मुख्याध्यापक सुभाषचंद्र माने, मुख्याध्यापिका विमल सूर्यवंशी, समीक्षा संध्या मिलिंद, नवनाथ चोरमले, अजहर नदाफ, बिल्कीस सय्यद आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.