विहे ते घाटमाथा रस्त्यासाठी सोमवारी रास्ता रोको आंदोलन

उपसभापती राजाभाऊ शेलार यांचा इशारा
पाटण, दि. 31 (प्रतिनिधी) – कराड ते चिपळूण रस्त्यावरील विहे ते घाटमाथा पर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. खराब रस्त्याने वहाने चालवत असताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनाचे मोठे नुकसान होत आहे, याबाबत संबंधित खात्याने दखल घेवून येत्या रविवारपर्यत रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती न घेतल्यास सोमवारी पाटण पंचायत समिती समोरील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली.
राजाभाऊ शेलार म्हणाले, संगमनगर धक्का येथे रस्त्याची चाळण झाली असून खड्ड्यात वहाने गेली की त्यांचे नुकसान होत आहे. हेळवाक येथील पुलानजीक सुध्दा रस्ता खचला आहे. जागोजागी खोल खड्डे पडल्यामुळे कोकणात जाणाऱ्या एस. टी. बस आणि इतर वहाने सुध्दा काळजीपूर्वक चालवावी लागत आहेत. दुचाकीस्वार या खराब रस्त्यामुळे बेजार झाले आहेत. या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात झाले असले तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही. यासाठी याबाबत योग्य दखल न घेतल्यास सोमवारी बांधकाम खाते आणि महामार्ग रस्ते प्राधिकरण यांच्या विरोधात रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही उपसभापती शेलार यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)