विसावा नाक्‍यावर दोन गटात राडा

एकाला भोकसण्याचा प्रयत्न; पोलिसांमुळे अनर्थ टळला
सातारा,  (प्रतिनिधी)
सातारा शहरातील विसावा नाका परिसरात युवकांच्या दोन गटात तुफान राडा झाला. या हाणामारीत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. या राड्यात एकाला भोकसण्याचा प्रयत्न झाला. युवकाने वार चुकवल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, सातारा शहर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने युवकांनी पळ काढला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विसावा नाका परिसरात युवकांचा एक गट जमला होता. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोर युवक जमत असतानाच युवकाच्या एका गटाने दुसऱ्या गटाला उद्देशून शिवीगाळ केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल होते. यावेळी तरूणांच्या दोन गटात तू तू.. मै मै सुरु झाल्यानंतर एका युवकाने धारदार शस्त्र काढून समोरच्या युवकावर हल्ला चढवला. समोरील युवकाने वार चुकवला मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील भितीचे वातावरण झाले होते. सुमारे दहा मिनिटे सुरु असलेला हा थरार पोलिस दाखल होताच संपला.
परिसरातील नागरिकांनी शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या युवकाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राडा करणारे दोन्ही गट हे महाविद्यालयीन असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)