विसर्जन मुद्यावरून आज पालिकेत विशेष सभा

मंगळवार तळ्याचा चेंडू आता न्यायालयात

सातारा,  (प्रतिनिधी) – मंगळवार तळे येथे विसर्जनावरून जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारल्यानंतर सातारा पालिकेची बुधवारी सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलवण्यात आली आहे. या बैठकीत उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेबाबत पुनर्विचार करावयाचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार तळ्यातील विसर्जनाचे भवितव्य आता न्यायालयाच्या आदेशानंतर स्पष्ट होणार आहे.
सातारा पालिकेचे पदाधिकारी उच्च न्यायालयात स्वतःच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे अडचणीत आले आहेत. तळ्यामध्ये विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाची मनाई आणि मंगळवार तळ्यात गणपती विसर्जनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट दिलेला नकार त्यामुळे कृत्रिम तळ्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी त्याला विरोध दर्शवल्याने पालिकेची चहूबाजूनी कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी कायदेशीर चाचपणी सुरू झाली असून उच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र देण्यासाठी वकिलांना पाचारण करण्यात आले आहे. त्याकरिता पालिकेचा ठराव गरजेचा आहे. त्यासाठी पालिकेत बुधवारी सकाळी अकरा वाजता तातडीची विशेष सभा बोलवण्यात आली आहे. सभेचे आमंत्रण तातडीने नगरसेवकांना व्हॉटस ऍपवरून देण्यात आले तसेच अजेंडाही घाईघाईने रवाना करण्यात आला. आता प्रतिज्ञापत्र काय दाखल करायचे यावर विशेष सभेत एकमताने राजकीय खल करावा लागणार आहे .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्याधिकाऱ्यांची अघोषित सुट्टी
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतच घेतलेली हजेरी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी भलतीच मनाला लावून घेतली. पदाधिकाऱ्यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी रजेवर जातो, असे सांगणाऱ्या गोरेंनी खरोखर कोणालाच न सांगता बाहेर राहणे पसंद केले. पालिका अडचणीत असताना मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेकडे न फिरकणे याविषयी नगरसेवकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केलेल्या फोनला सुद्धा गोरे यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)