विसर्जन मिरवणुकीत मोबाइल लांबविणाऱ्या 11 जणांना पोलीस कोठडी

पुणे- गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाइल लांबविणाऱ्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी फरासखाना पोलिसांनी दोन गुन्ह्यात अटक केलेल्या 8 जणांना दि. 29 सप्टेंबरपर्यंत, तर डेक्‍कन पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना दि. 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरासखानाच्या पहिल्या गुन्ह्यात उबेदुर रहिमन महंमद दिलदार (वय 19), मुस्ताक अहमद महंमद इब्राहिम (वय 35), फिरोज इक्‍बाल शाह (वय 40) आणि जाकिर हुसेन महंमद एहसान (वय 40, सर्वजण, रा. मालेगाव जि. नाशिक), अशी पोलीस कोठडी झालेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 30 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत रोहन विनायक कदम (वय 28, रा. पाषाण-सुस रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या रात्री 9.45 च्या सुमारास श्रीनाथ थिएटर ते बोहरी आळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोबाइल लांबविण्यात आला होता. दुसऱ्या गुन्ह्यात अकबरखान हबीब खान (वय 30), अफसरखान हबीब खान (वय 26), महंमद शहजाद महम्मंद सुलेमान (वय 19) आणि मोहम्मद शाबान मुतृजा (वय 40, रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 35 मोबाइल जप्त केले आहेत. सुमित सुभाष घंटे (वय 34, रा. नऱ्हे) यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल आहे. रात्री 8.45 च्या सुमारास कसबा पेठेत त्यांचा मोबाइल लांबविण्यात आला होता. तर डेक्‍कन सुरज सुभाष कोल (वय 23), अरूण प्रकाश कोल (वय 21, दोघेही, रा. फिरस्ता, मूळ. मध्यप्रदेश) आणि दीपक चापारी शाम (वय 19, रा. उत्तरप्रदेश) या तिघांना अटक केली आहे. तिघांकडून एक मोबाइल जप्त करण्यात आला अहे. रामेश्‍वर नारंगे (वय 26, रा. आंबेगाव बुद्रुक) यांच्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा मोबाइल रात्री 9.30 च्या सुमारास झेड ब्रीजवर लांबविण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)