विषमुक्त अन्न स्वतः घ्या , दुसर्याला द्या

एम. के. पालीवाल ः केंद्र शासनाच्या समितीची सेंद्रीय उत्पादक गटास भेट
नगर – रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत तर खराब होत चालला आहे. पिकांवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. तेच अन्न आपण खात आहोत. त्याचा अप्रत्यक्षरित्या शरीरावर परिणाम होत आहे. आजराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शेतकऱ्यांनी आता विषमुक्त अन्न पिकविणे काळाची गरज आहे. त्यावर एकाच पर्याय आहे तो सेंद्रीय शेतीचा. सेंद्रीय शेती करून शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्न स्वतः खा व दुसऱ्यालाही द्या, असे प्रतिपादन आरसीओएफ, भुवनेश्‍वरचे सचालक एम. के. पालीवाल यांनी केले.
केंद्र पुरस्कृत शाश्‍वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या समितीने सेंद्रीय उत्पादक गटास भेट देऊन पाहणी केली. यावेळी पालीवाल बोलत होते. यावेळी बंगलोरचे विठ्ठल देवघरे, प्रकल्प संचालक (आत्मा) भाऊसाहेब बऱ्हाटे, राज्य नोबल अधिकारी अशोक बानखेले, उपसंचालक सुरेश जगताप, कौस्तुभ कराळे, बाळासाहेब खेमनर, प्रगतशील शेतकरी राजेंद्र शेळके आदींसह शेतकरी उपस्थित होते.
पालीवाल पुढे म्हणाले की, गटामार्फत सेंद्रीय शेती करा. आता सर्व शासकीय योजना या गटामार्फत दिल्या जात आहेत. सेंद्रीय शेतीकडे लोकांचा कल वाढला आहे. गटामार्फत सर्वांनी वेगवेगळी पिके घ्यावीत. सर्वांच्या मालाला चांगला भाव मिळेल. उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल. सेंद्रिय मालाला आता जगात चांगली मागणी आहे. सेंद्रिय शेतीचे मार्केट आपल्या दारात येईल. जीवामृत, व्हर्मीवॉश, कंपोस्ट सीपीपी याचा शेतकर्यांनी वापर करावा. परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीचा मुख्य उद्देश आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतीची भौगोलिक रचना घडवत असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय पुरस्कृत शाश्‍वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या 2 सदस्य समितीने राहाता, कोपरगाव व पारनेर या तीन तालुक्‍यांतील सेंद्रिय शेती अंतर्गत स्थापित गटातील शेतकऱ्यांशी भेट देऊन संवाद साधला. राहाता तालुक्‍यातील नेताजी सेंद्रीय शेती समूह, हसनापूर व कोपरगाव तालुक्‍यातील साईसमर्थ सेंद्रीय शेती, जेऊर कुंभारी येथील सेंद्रीय शेती गटाची भेट घेऊन संवाद साधला. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या गव्हाला प्रति क्विंटल 2500 रुपये भाव मिळाला. सेंद्रीय शेती भेटी दरम्यान जीवामृत, व्हर्मी कंपोस्ट, व्हर्मी वॉश, कंपोस्ट सीपीपी इत्यादी युनिटची पाहणी केली.
सेंद्रीय शेतीची सुरुवात 2016पासून सुरू केली असून, पहिल्या वर्षी व दुसर्या वर्षी उत्पादनात हळूहळू वाढ झाली. तिसऱ्या वर्षी उत्पादन खर्च कमी होऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल, असे मत संतोष विखे यांनी व्यक्त केले.
नगर जिल्ह्यात 36 सेंद्रीय शेती गट असून, त्या अंतर्गत 1600 शेतकरी आहेत. जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे एकूण क्षेत्र 1 हजार 800 एकर असून, सेंद्रीय शेतीचे काम हे जिल्ह्यात चांगले चालले असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)