विश्वजीत कदम यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई – पलूस-कडेगाव (जि. सांगली) मतदार संघात झालेल्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेसचे विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले आहेत. पोटनिवडणूकीतील विजयानंतर विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंतगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघातील जागा रिक्त जागा झाली होती. त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसने पंतगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांनी उमदेवारी दिली होती. परंतु, त्यांच्या विरोधात इतर कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार रिंगणात न उतरविल्याने विश्वजीत हे बिनविरोध निवडूण आले होते. आज त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधानसचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या शपथविधी सोहळ्याला लोकसभा सदस्य अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे सदस्य शरद रणपिसे, मोहनराव कदम, जयंत पाटील, आनंदराव पाटील, हरिभाऊ राठोड, अमरनाथ राजूरकर, हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेचे विद्यमान सदस्य तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सदस्य जयंत पाटील, सुनिल तटकरे, डी. पी. सावंत, डॉ. सतेज पाटील, गोपालदास अग्रवाल, सुनिल केदार, प्रणिती शिंदे, विधीमंडळाचे सदस्य, तसेच सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)