विशेष कार्यकारी अधिकारीपदी आकश जाधव

पिरंगुट – येथील आकाश मारूती जाधव यांची महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नुकतीच नियुक्‍ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह शाखा विभागाच्या आदेशानुसार पौड येथील मुळशी तालुका तहसील कार्यालयात त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ही नियुक्‍ती पाच वर्षांसाठी आहे. आकाश जाधव हे मुळशी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टचे माजी कार्यकारणी सदस्य व पुणे जिल्हा विकास मंच मुळशी तालुका मानद सचिव आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.