विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे

भिलार : मार्गदर्शन करताना किसनशेठ भिलारे शेजारी शैलेशकुमार, विकास कुमार, अजय जांभळे व इतर (छाया सचिन भिलारे)

शैलेश कुमार यांचे प्रतिपादन
पाचगणी, दि. 31 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र बॅंक ही सर्वसामान्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी कटिबद्ध आहे. बॅंकेच्या शेतकरी कर्ज, शैक्षणिक कर्ज, घर कर्ज अशा विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आणखी समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन बॅंकेचे सातारा झोनल ऑफिसर शैलेश कुमार यांनी केले.
भिलार (ता. महाबळेश्वर) येथील महाराष्ट्र बॅंकेच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शैलेश कुमार बोलत होते. यावेळी शाखा व्यवस्थापक विकास कुमार, कृषीतज्ञ किसनशेठ भिलारे, शरद चौधरी, सहाय्यक व्यवस्थापक अजय जांभळे, पांडुरंग गोळे, गुलाब वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
किसनशेठ भिलारे यावेळी म्हणाले, भिलारसह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्‍याला शासनाने 1984 साली इको सेन्सिटिव्ह झोन लागू केला आहे. त्यामुळे आता 84 पूर्वीची घरे बांधताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. बॅंकेने या घरांसाठी शेतकऱ्यांना कर्ज वितरण केल्यास मोठी मदत होणार आहे. तर स्ट्रॉबेरी हे पीक शासनाच्या नुकसान भरपाईस पात्र नसल्याने शेतकाऱ्यांपुढे मोठ्या अडचणी आहेत.
यावेळी ग्राहकांनी विविध समस्या मांडल्या. याचे निराकरण अधिकाऱ्यांनी केले. यामध्ये बॅंकेच्या भिलार शाखेच्या वेळेत बदल, नवीन कर्जासाठी एनओसी येणाऱ्या अडचणी सांगितल्या.
यावेळी सुरेंद्र भिलारे, गणपत उंबरकर, दत्ता गावडे, अशोक भिलारे, शशिकांत जाधव, वसंत पार्टे, विकास दानवले, संतोष गोळे व या परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. बॅंकेचे व्यवस्थापक विकास कुमार यांनी बॅंकेच्या कारभारविषयी आढावा घेतला. अजय जांभळे यांनी सूत्रसंचालन केले तर अन्नपूर्णा भिलारे यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)