विविध प्रश्‍नांवर सर्व लोकप्रतिनिधी जनतेबरोबर हवेत

माजी खासदार यशवंतराव गडाख : “लेक वाचवा लेक शिकवा’ अभियानाची सुरुवात
नेवासे फाटा – कुठल्याही लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्‍नांवर जनतेबरोबर राहिले पाहिजे. शंकरराव आमदार असताना तालुक्‍याच्या पाण्याच्या प्रश्‍नावर त्यांनी आपल्या स्वतःच्या सरकार व मंत्र्यांविरोधात आवाज उठवून मोर्चे काढले होते. आताही सर्व लोकप्रतिनिधींनी आरक्षणाच्या प्रश्‍नावर जनतेबरोबर राहिले पाहिजे, अशी अपेक्षा माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्‍त केली.

पंचायत समितीमार्फत “लेक वाचवा लेक शिकवा’ या शिल्पाकृतीचे अनावरण ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ नेते गडाख म्हणाले की, जुन्या जिल्हा परिषद व पंचयात समितीच्या सदस्यांचा सन्मानाचा हा अनोखा कार्यक्रम होत आहे.पंचयात राज व्यवस्थेमधून मोठी क्रांती होत असते. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना आमच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने एक वर्षाचे बजेट पशुसंर्वधनासाठी दिले होते. त्यातून जिल्ह्यात मोठा दूध व्यवसाय वाढला होता. आरक्षणाचा मोठा ज्वलंत प्रश्‍न उभा राहिला आहे. समाज एकमेकांपासून दूर जात आहे का असा प्रश्‍न उभा राहिला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा, धनगर व मुस्लिमांचा आरक्षण प्रश्‍न सोडविणे शक्‍य आहे. आरक्षण प्रश्‍नावर सुनीता गडाख यांनी राजीनामा दिला. यासाठी मोठे धाडस लागते. ते सुनीता गडाख यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वागत गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांनी केले. प्रास्ताविकात माजी सभापती सुनीता गडाख यांनी यांनी आपल्या काळातील विकास कामाचा लेखाजोखा मांडला. दलित वस्ती, घरकूल यासह अनेक योजनेत कोट्यवधींची कामे केली. मराठा, धनगर व मुस्लीम समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना मनात होती. पंचायत समितीला बहुमताने निवडून आले, तालुक्‍याची सभापती झाले. याहीपेक्षा समाजाच्या प्रश्‍नावर राजीनामा देता आला याचा मला मनस्वी आनंद झाला आहे, असे गडाख म्हणाल्या.

या कार्यक्रमास माजी आमदार शंकरराव गडाख , अशोक कारखाण्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदे , भाजपचे दिनकर गर्जे , प्रदीप ढोकणे , दिलीप सरोदे , उप नगरअध्यक्ष नंदकुमार पाटील , भाऊसाहेब वाघ, पुरुषातम्‌ सर्जे , महमदभाई आतर , जांनकिराम डवले , नानासाहेब तुवर , कडूबाल कर्डीले , भाऊसाहेब मोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन के .च वाखुरे यांनी केले तर आभार किशोर जोजार यांनी मानले .

राजीनामा देण्यासाठी मोठी इच्छाशक्‍ती हवी…
भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिनकर गर्जे म्हणाले की, जुन्या लोका चा सन्मान चांगला उपक्रम आहे. काम करताना सर्वांनी जातीपलीकडे जाऊन काम केले पाहिजे. साधा सरपंच झाल्यावर व ठराविक काळानंतर ते पदही सोडत नाही, असे आपण सर्वांनी बघितले आहे. सुनीता गडाख यांनी आरक्षणासाठी अंतकरणातून विहित नमुन्यात राजीनामा दिला व तो स्वीकारला गेला. यासाठी मोठी इच्छाशक्‍ती लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)