विविध देशांबरोबराच्या करारांना मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली – विविध देशांबरोबराच्या करारांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या करारांमध्ये भारत आणि अमेरिकेच्या विमा नियामकांच्या परस्पर सहयोग करारासह बल्गेरिया, मोरोक्को आणि रवांड या तीन देशांबरोबरच्या द्विपक्षीय करारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

अमेरिकेबरोबरच्या करारात भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण आणि अमेरिकन सरकारची संघीय विमा कार्यालये यांच्यात माहितीची देवाण घेवाण आणि संशोधनातील सहकार्याची तरतूद आहे. बल्गेरियाबरोबरच्या पर्यटन क्षेत्रातील द्विपक्षीय करारामुळे दोन्ही देशातील पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत आणि मोरोक्को यांच्यातील करारात दोन्ही देशातील विविध शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करणे आणि विमान कंपन्यांची कार्यालये सुरू करण्याची तरतूद आहे. रवांडा बरोबरचा करार दोन्ही देशातील व्यापार सहकार्यासंबंधी असून त्यामुळे दोन देशांतील व्यापारी आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. या करारावर 23 जुलै 2018 रोजी सह्या करण्यात आल्या होत्या.

रेल्वे क्षेत्रातील वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि त्यात वृद्धी करण्यासाठी भारतीय आरएसडीओ (रिसर्च डिझाईन अँड्‌ स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन) आणि केआरआरआय (कोरियन रेल्वे रिसर्च इन्स्टिट्यूट) यांच्यातील सहकार्याबाबतच्या समझोता कराराची माहिती मंत्रिमंडळाला देण्यात आली. या करारावर 10 जुलै रोजी सह्या करण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)