विविधा: मेलडी क्‍वीन सुरैय्या

माधव विद्वांस

पहिली मेलडी क्‍वीन म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या अभिनेत्री, गायिका, सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ‘सुरैय्या’ यांचा आज स्मृतिदिन (31 जानेवारी 2004). त्यांचा जन्म 15 जून 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये गुजरानवाला येथे झाला. त्यांना मलिका-ए-हुस्न, मलिका-ए-तराना, मलिका-ए-अदा म्हणूनही ओळखले जायचे. आकाशवाणीवर लहान मुलांच्या कार्यक्रमात त्या 1937 साली प्रथम गायल्या. 1940 ते 1950 या दशकात त्यांनी 67 चित्रपटामध्ये काम केले तर 338 गीतांसाठी पार्श्‍वगायन केले. वर्ष 1936 मध्ये अभिनेत्री नर्गिस हिची आई जद्दनबाईने त्यांना ‘मॅडम फॅशन’ या चित्रपटात वयाच्या सातव्या वर्षीच भूमिका दिली. कोणतेही संगीताचे शिक्षण नसताना त्यांनी अभिनयाबरोबर गायिका म्हणूनही नाव कमावले. वर्ष 1942 मध्ये ‘शारदा’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिले पार्श्‍वगायन केले. त्यांचे काका झहीर चित्रपट क्षेत्रात खलनायक म्हणून ते खूप लोकप्रिय होते. ते सुरैय्याला घेऊन ताजमहालच्या सेटवर गेले होते. तेथे नानुभाई वकिलांनी त्यांना पाहिले व मुमताज महलच्या बालपणाच्या भूमिकेसाठी सुरैय्या यांची निवड केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पन्नासच्या दशकात त्यांचे ‘प्यार की जीत’,’ बड़ी बहन’,’दिल्लगी’हे चित्रपट खूपच गाजले. सुरैय्यांनी के. असिफच्या ‘दर्द,’ ‘पुष्प’ व मेहबूब खानच्या ‘मौल्यवान घड्याळ’ या सहाय्यक अभिनेत्री असलेल्या चित्रपटातही चांगला अभिनय केला. त्यांचा नायिकेचे काम असलेला पहिला चित्रपट “तदबीर’होता. “चंद्रगुप्त’च्या रिहर्लसलचे वेळी सुरैय्याला पाहून के. एल. सहगल खूप प्रभावित झाले आणि त्यांनी जयंत देसाई यांना ‘तदबीर’ चित्रपटात काम करण्याची शिफारस केली. हा चित्रपट 1945 मधे प्रदर्शित झाला. वर्ष 1950 मध्ये चित्रपट ‘अफसर’ चे चित्रीकरणादरम्यान देव आनंद-सुरैय्या दोघे बसलेली नाव उलटली त्यावेळी देव आनंदने त्यांना वाचविले होते. त्यांचे व अभिनेते देवानंद यांचे सूर जुळले. दोघेही प्रेमात पडले, पण सुरैय्याचे घरातून विरोध झाल्याने त्यांचा विवाह होऊ शकला नाही.

देव आनंद यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिकबरोबर वर्ष 1954 मध्ये विवाह केला. पण सुरैया मात्र अविवाहितच राहिली. सुरैय्या व देव आनंद यांचे प्रेमप्रकरण खूप गाजले. तिच्या आजीने या विवाहास संमती न दिल्याने हे प्रेमप्रकरण सफल झाले नाही. ‘रोमान्सिंग विथ द लाइफ’ या आत्मचरित्रात देव आनंद यांनी त्यांचा उल्लेख केला आहे. 31 जानेवारी 2004 रोजी मरीन ड्राईव्ह वरील कृष्ण महाल या अपार्टमेंट मध्ये त्यांचे निधन झाले. “तू मेरा चॉंद और मैं ‘तेरी चांदनी हे दिल्लगी चित्रपटातील गाणे व अभिनय अजूनही ताजा वाटतो. या महान अभिनेत्रीला वंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)