#विविधा : दानशूर नाना शंकरशेट  

माधव विद्वांस 

मुंबई व पुणे येथे नाना शंकरशेठ यांचे नावाने रस्ते आहेत. आज 31 जुलै ही त्यांची पुण्यतिथी आहे. पण कोण होते हे शंकरशेट? भारतातील रेल्वे तसेच मुंबईतील पहिली शैक्षणिक संस्था व मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा वाटा मोठा मानला जातो. त्यांचे नाव जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे. मूळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील. त्यांचे वडील मुंबई येथे व्यापारासाठी आले. शंकरशेट यांचा जन्म 10 ऑक्‍टोबर 1800 रोजी मुंबईतच झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडिलांच्या निधनानंतर व्यापाराची जबादारी त्यांच्यावर पडली पण अल्पावधीत विश्‍वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील हुंडी अर्थव्यवहार बॅंकांकडे न देता शंकरशेट यांच्यामार्फत करीत, एवढा विश्‍वास त्यांनी कमावला होता. शिक्षणाचे महत्व ओळखून तत्कालीन ब्रिटिश कंपनी सरकारकडून शाळा काढण्यासाठी प्रयत्न केले. एल्फिन्स्टनने सन 1822 मध्ये मुंबई येथे नाना तसेच स. का. छत्रे यांच्या साह्याने हिंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली या संस्थेचे पुढे बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही मुंबईतील पहिली शैक्षणिक संस्था. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी त्यांनी 4,43,901 रुपयांचा फ़ंड जमविला व त्याला एल्फिन्स्टन फंड असे नाव दिले. नाना हे त्याचे विश्‍वस्त राहिले.

सन 1824 ते 1856 या कालावधीत या संस्थेचा सतत विस्तार होत गेला. सन 1845 मध्ये मेडिकल कॉलेज 1848 मध्ये मुलींची शाळा त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केली. सन 1855 मध्ये पहिले विधी विद्यालय निघाले. त्याचबरोबर बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, मुंबई-ठाणे रेल्वे, नाट्यगृह, सोनापूरची स्मशानभूमी विकसित करणे या सर्व गोष्टीत त्यांचा सहभाग राहिला. सन 1845 मधे सर जमशेटजी यांच्यासह त्यांनी भारतीय रेल्वे संघटनेची स्थापना केली. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन खझ रेल्वेची स्थापना झाली. रेल्वेच्या 10 संचालकांपैकी ते एकमेव भारतीय सदस्य होते. पहिल्या मुंबई ठाणे रेल्वेचे ते प्रवासी होते. मुंबई कायदे मंडळाचे ते पहिले भारतीय सदस्य होते. तसेच पहिले भारतीय ऑनररी मॅजिस्ट्रेट (जस्टीस ऑफ पिस) होते. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यास शंकरशेट शिष्यवृती दिली जाते. दि. 31 जुलै 1865 रोजी नाना शंकरशेट यांचे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)