#विविधा: ढगफुटी 

अश्विनी महामुनी 
गेल्या काही दिवसात केरळमधील पूर हा साऱ्या देशभराच्या चिंतेचा विषय झाला आहे. बघता बघता क्षणात होत्याचे सारे नव्हते करून टाकणाऱ्या या पुराच्या पाण्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गेला पंधरवडा एकच विषय आहे. केरळचा पूर. मी शाळेत असताना माझ्या वर्गात दिव्या नायर नावाची एक मैत्रीण होती माझी. तिचे आणि माझे वडील एकाच कंपनीत कामाला होते. आम्ही पहिली ते दहावी एकाच वर्गात शिकलो. एकाच स्कूल बसने जात होतो. कधी तरी तिचे माझे फोनवर बोलणे व्हायचे. ती केरळबद्दल नेहमी भरभरून बोलायची. एकदा मी तिच्याबरोबर तिच्या गावीही जाऊन आले. केरळला देवभूमी का म्हणतात, हे तेथे जाऊन आल्याशिवाय कळयचे नाही,
मात्र या पुराने ही देवभूमी उद्‌ध्वस्त होऊन गेली आहे.
हा विध्वंसकारी पूर कसा आला याबद्दल चर्चा होत राहतील. पाऊस हे एक कारण आहेच, पण धरणांचे पाणी सोडल्याने मोठा हाहाकार माजला हे ही खरे आहे. गटारातून काड्यापेट्या वाहून जातात तशा या पुरात मोटरगाड्या वाहून जाताना पाहून, घरेदारे पडताना-वाहून जातना पाहून, संपूर्ण शहरेच्या शहरे पाण्याखाली जाऊन त्यांचे प्रचंड्‌ तलावात झालेले रूपांतर पाहून मन भरून आले.
आज पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले, की माणूस कितीही सुधारला. चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याची तयारी करू लागला, विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी शेवटी निसर्गापुढे तो हतबल आहे. अलीकडच्या अनेक घटनांनी हे सत्य निसर्गाने सिद्ध करून दाखवले आहे. मग ती उत्तराखंडची ढगफुटी असो, सुनामी असो, चक्रीवादळे असोत वा भूकंप असोत. कितीही गमजा केल्या तरी माणूस ही निसर्गाच्या हातचे खेळणे आहे, ही गोष्ट स्वीकारावीच लागते. तो खेळवतो तोपर्यंत खेळायचे, तो क्रुद्ध झाला की शरणागत व्हायचे. टीव्हीवर पुराच्या व्हिडिओज बघत असताना कोणीतरी म्हटले, केरळमध्ये ढगफुटीच झाल्यामुळे हा सारा विध्वंस झाला.
लगेच माझ्या मुलाने विचारले, ढगफुटी म्हणजे काय?
खरंच ढगफुटी हा शब्द आपण नेहमी ऐकतो, वाचतो, बोलतोही. पण ढगफुटीचा नेमका अर्थ मात्र आपल्याला माहीत नसतो. मलाही माहीत नव्हता. ढगफुटी म्हणजे काहीतरी भयंकर-ढगफुटी झाली की तो सारा प्रदेश नेस्तनाबूत होतो.
एवढे मला माहीत होते,मग मी मुद्दाम ढगफुटी म्हणजे काय याचा शोध घेतला. वादळवाऱ्यासह विजांच्या प्रचंड गडगडाटात अचानक कोसळणारा प्रचंड पाऊस; त्यामुळे अल्पकाळात निर्माण होणारी पूरपरिस्थिती म्हणजे ढगफुटी असे म्हणता येईल. तासाभरात 100 ते 200 मिमी पाऊस पड्‌ला म्हणजे त्या भागात ढगफुटी झाली असे म्हणता येईल. पश्‍चिम हिमालयाच्या क्षेत्रात मान्सूनमध्ये अशा घटना अधिक प्रमाणत होतात. ढगफुटीचा सर्वात भीषण परिणाम म्हणजे त्या भागात येणारा प्रचंड पूर. ढगफुटी ही अत्यंत आव्हानात्मक नैसर्गिक आपत्ती आहे. तिचे अचूक पूर्वान्मान करणे ही प्रचंड गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ढगफुटी घडवून आणणारा ढग हा 15 कि,मी उंचीपार्यंत असू शकतो.
ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते. त्यावेळी पाऊस जणू सूर्यप्रकाशात पडल्यासारखा वाटतो. ढगफुटीच्या अगोदर हवामान पावसाळी असते. काळोखी दाटलेली असते, पण ढगाफुटीचा पाऊस पडताना काळोखाचे प्रमाण अगदी कमी होते. कधी जणू सूर्यप्रकशात पडल्यासारखा वाटतो. ढगफुटीच्या पावसाचे मोठे मोठे थेंब हे याचे कारण. के थेंब आरशासारखे काम करत प्रकाश परिवर्तित करत राहतात, त्यामुळे नेहमीपेक्षा प्रकाश दिसतो.
6 ऑगस्ट 2010 रोजी लेहमध्ये झालेली ढगफुटी ही जगातील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. तेव्हा अवघ्या एका मिनिटात 2 इच (50 मिमी) पाऊस पडला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)