#विविधा : अमेरिकेचे वादग्रस्त वॉटरगेट प्रकरण 

माधव विद्वांस 
अमेरिका जगातील प्रगल्भ लोकशाही आहे या कल्पनेला धक्का देणारी गोष्ट उजेडात आली होती 24 जुलै 1974 रोजी! न्यायालयाने अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांना विरोधक व त्यांच्या कुटुंबियांवर पाळत ठेवणे, त्यांचे कॉल रेकॉर्ड करणे, खोटी कागदपत्रे बनवणे आणि या सगळ्या बेकायदेशीर गोष्टी करण्यासाठी अधिकृत शासनयंत्रणा राबविणे यासाठी दोषी ठरविले. वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार बॉब वूडवर्डस यांनी याचा पाठपुरावा करून सर्व पोलखोल केली. यातील सर्व पाच आरोपी मुद्देमालासह रंगेहाथ पकडले होते. त्यांना 18 जून रोजी न्यायालयासमोर उभे करणेत आले होते.त्यापैकी एकाने आपण उखअधिकारी असल्याचे सांगितले. हि सर्व गोष्ट बॉब वूडवर्डस ऐकत होते,व त्यांना एका भयानक कटाची शक्‍यता वाटू लागली. दरोडा म्हटले कि पैसा अडका सोने नाणे यांची चोरी हा उद्देश असतो पण येथे कार्यालय असल्याने व दरोडेखोरांचेकडे सापडलेल्या वस्तू बघून त्यांना संशयाने पछाडले.

त्यावेळी अध्यक्ष असलेले रिचर्ड निक्‍सन पूर्वी महायुद्धाचे वेळी नेव्ही मध्ये अधिकारी होते. लष्करातील हेरगिरीचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव होताच. निक्‍सन दुसरी निवडणूक जिंकताना विरोधी पक्षाची चाल ओळखण्यासाठी व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आपले लष्करातील कसब वापरत होते. सन 1972 च्या निवडणुकीसाठी पक्षाने त्यांची पुन्हा उमेदवारी घोषित केल्यावर, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी एक समिती गठीत केली. डेमोक्रॅटिक पक्षाचे मुख्यालय वॉटरगेट कॉम्प्लेक्‍समधे होते. यावर दरोडा टाकण्याचे निवडणुकीपूर्वीच ठरले होते. कार्यालयात घुसलेल्या दरोडेखोरांकडे जे सामान सापडले त्यामध्ये छुपे कॅमेरे, फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग साठी बसवायचे यंत्र, आणि इतर काही यंत्रे जी ऑफिस मध्ये बसलेल्या लोकांचे संभाषणही रेकॉर्ड करु शकतील अशी उपकरणे सापडली. विरोधी पक्षाची रणनीती समजून घेऊन स्वतःचे डावपेच ठरविण्याचासाठी हा उद्व्‌याप केला गेला. बॉब वूडवर्डस याना काही गोष्टी खटकल्या.पाच आरोपी पैकी चोघेजण उखएजन्ट होते, व पोलीस फक्त साधी चोरी एवढेच या घटनेकडे पाहत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरोडेखोरांच्या वकिलाची नेमणूक कोणी केली या गोष्टींची माहितीही मिळू शकली नाही या गोष्टी त्यांना खटकल्या. ऋइख ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत होती त्यामुळे त्यांचा संशय वाढू लागला. अमेरिकन सिनेटने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मे 1973 मध्ये सिनेट वॉटरगेट कमिटीचे गठन केले.त्यासमोर जॉन डीन यांनी निक्‍सन यांचाही या प्रकरणात हात असल्याचे चौकशी समितीसमोर सांगितले. आरोप सिद्ध झालेवर निक्‍सन याना 9 ऑगस्ट 74 रोजी राजीनामा द्यावा लागला व जेराल्ड फोर्ड अमेरिकेचे 38 वे राष्ट्राध्यक्ष झाले. एक महिन्याच्या आत जेराल्ड फोर्ड यांनी आपल्या विशेषाधिकारात निक्‍सन याना सर्व गुन्ह्यांसाठी पूर्ण आणि बिनशर्त माफी ‘दिली. पण 48 जणांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)