विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी नवऱ्यासह तिघांवर गुन्हा

मंचर – पेठ (ता. आंबेगाव) येथील 23 वर्षीय विवाहितेला त्रास देऊन तिचे जगणे असह्य केल्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस तिचा नवरा, सासू सासरा, दीर जबाबदार असल्याकारणाने मंचर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रियांका रोहन शिंदे हिला सासरच्या लोकांनी किरकोळ कारणावरून भांडणतंटा, शिवीगाळ दमदाटी करून लग्नात मानपान दिला नाही, या कारणावरून माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावून जीवन जगणे असह्य केल्याने तिने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आली, अशी फिर्याद प्रियांकाचा भाऊ वैभव बाळू कड यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली. मंचर पोलिसांनी मयत प्रियांकाचा रोहन सदाशिव शिंदे (नवरा), सदाशिव रामभाऊ शिंदे (सासरा), मंगल सदाशिव शिंदे (सासू),स्वप्निल सदाशिव शिंदे (दीर), (सर्व रा. पेठ-तळेकर वस्ती, ता. आंबेगाव) यांच्याविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप जाधव करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)