विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणातून पतीसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

पुणे – विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातून पती, दीर, जावू, सासू आणि सासऱ्याची सबळ पुराव्याअभावी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.आर.पुरवार यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
पती उत्तम बंडू आडकर (वय 31), दीर सुभाष (वय 40), जाऊ वैशाली, सासू हिराबाई (वय 60) आणि सासरे बंडू (वय 68, सर्वजण, रा. शिवली, ता. मावळ) अशी मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे  ऍड. गोरक्षनाथ काळे, ऍड. अतुल जगताप, ऍड. दत्ता शिंदे, ऍड. बनसोडे यांनी काम पाहिले. प्रगती उत्तम आडकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांनी 7 एप्रिल 2013 रोजी विष पिऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. उत्तम आणि प्रगती यांचा विवाह 29 मे 2011 रोजी झाला. उत्तम आणि प्रगती यांच्यात भांडण होत असत. बायकोचा दर्जा देत नसत.घरचेही त्यांच्याशी नीट वाघत नसत. त्यांना मारहाण करत असत. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे पाच जणांवर भादवी कलम 498 (अ), 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. मयत प्रगती यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आहे. परंतु, सी.ए.रिपोर्टच्या तपासामध्ये विषाचा अंश मिळून आला नाही. त्यामुळे प्रगती या कशाने मयत झाल्या, हे सिध्द होत नाही. त्यांनी घटनेच्या दिवशी दिवसभर टोमॅटोच्या शेतात काम केले. संध्याकाळी मळमळ होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू अपघाती आहे. त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली नाही, असा युक्तीवाद ऍड. गोरक्षनाथ काळे यांनी केला. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)