विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरणार नाही; कलम 497 रद्द: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली – पती-पत्नी विवाहबाह्य संबंधावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पती हा पत्नीचा मालक नाही. महिलेचा सन्मान सर्वोच्च असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. शिवाय कलम ४९७ हे महिलेच्या सन्मानाशी सुसंगत नसल्याने न्यायालयाने ते कलमच रद्दबातल ठरवले आहे. समाजात महिला व पुरुषांना समान अधिकार आहेत. व्याभिचार हे घटस्फोटाचे कारण असू शकते. गुन्ह्याचे नाही, असेही स्पष्टीकरण न्यायालयाने दिले आहे.

अनिवासी भारतीय असलेले जोसेफ शाइन यांनी ४९७ कलमाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सुनावणी करताना पाच बेंचच्या घटनापीठाने ४९७ कलम रद्द ठरविले. न्या. ए एम खानविलकर, न्या. आर एफ नरिमन, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांचा घटनापीठात समावेश होता. यावेळी जोडीदाराने जर विवाहबाह्य संबंध ठेवले व विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली तर ते आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कलम ४९७ काय होते ?
भादंवि कलम ४९७ नुसार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पुरूषाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवले तर व्यभिचाराचा गुन्हा दाखल होऊन पाच वर्षे तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होते, पण यामध्ये महिलेले दोषी धरले जात नव्हते. यात केवळ विवाहित महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे हाच व्यभिचार ठरतो. विधवा, वेश्या किंवा अविवाहित महिलांना हे कलम लागू होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)