विलास लांडे यांना रुपीनगरमधील मुस्लीम बांधवांचा पाठिंबा

पिंपरी – तळवडे, रूपीनगर येथील मुस्लीम समाजाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. येथील मुस्लीम समाजाने लांडे यांचा सत्कार करून भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. जातीयवादी पक्षांना आणि दादागिरी करणाऱ्यांना मतदारसंघातील मुस्लीम समाज निवडणुकीत थारा देणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांनी व्यक्‍त केले.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, अशुदुल्ला सय्यद, हनीफ मुल्ला, महबूब शेख़, इम्तियाज शेख, जावेद पठाण, ज़मीर मुल्ला, रहीम शेख़, समीर मुल्ला, आरिफ़ शेख़, नूर शेख, नसिर शेख़, इमरान शेख़, मुजाफर शेख़, लतीफ सय्यद, अखलाक शेख़, अय्याज खान, समीर शेख, मौसिन शेख आदी
उपस्थित होते.

रुपीनगरमध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाने बैठक घेऊन निवडणुकीत जातीयवादी पक्षाचा कोणीही निवडून येता कामा नये, असा निर्णय घेतला. तसेच अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला. लांडे यांना रुपीनगरमध्ये बोलावून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.