विम्याचे कर्ज कसे फायद्याचे?

जर आपल्याला अचानक पैशाची गरज भासत असेल तर आपण वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डकडून रोकड उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यावर आकारण्यात येणाऱ्या जबरी व्याजाकडे दुर्लक्ष करतो. अशा स्थितीत कर्जासाठी बहुतांश गुंतवणूकदारांकडे जीवन विमा पॉलिसीसारखा स्वस्त आणि सुलभ पर्याय असतो. विमा पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही हमीची किंवा क्रेडिट स्कोरची चिंता करण्याची गरज नाही. मात्र काही योजना वगळता कर्जासाठी पॉलिसी किमान तीन वर्ष सक्रिय असणे गरजेचे आहे.

वैयक्तिक कर्जासाठीं क्रेडिट स्कोर महत्त्वाचा – पर्सनल लोन, क्रेडिट कार्डने रोख रक्कम काढायची असेल तर त्यावर 11 ते 24 टक्‍क्‍यांपर्यत व्याज आकारले जाते. हे व्याजदर आपला खिसा बराच रिकामा करू शकतात. अशा प्रकारच्या कर्जमंजुरीसाठी आपल्याला चांगल्या क्रेडिट स्कोरची देखील गरज भासते. हे कर्ज कमी काळासाठी म्हणजे एक ते पाच वर्षांसाठी मिळू शकते. याआधारावर हा पर्याय आपल्याला महागडा ठरू शकतो. आपल्या पहिल्या कर्जाच्या आधारावर या कर्जाची मर्यादा निश्‍चित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पॉलिसी हीच हमी – जर आपल्याकडे सरकारी किंवा खासगी कंपनीची जीवन विमा पॉलिसी असेल तर त्यावर 9 ते 10 टक्‍के व्याजदराने कर्ज मिळू शकते. यात आपली पॉलिसी ही हमी देण्याचे काम करते. एलआयसीची मनी बॅक, एंडाऊमेंट प्लॅनवर कर्ज मिळते. काही यूलिप योजनांवरही कर्ज मिळते. अर्थात टर्म इन्शूरन्स पॉलिसीवर कर्जाचा पर्याय नाही.

किरकोळ ओझे – जर आपल्याला पॉलिसी वार्षिक सात ते आठ टक्के परतावा देत असेल तर प्रत्यक्षात कर्जावरचे व्याज हे एक ते दोन टक्केच राहू शकते. पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीपर्यंत कर्जाची परतफेड करू शकता. त्याचेवळी हे कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला डिफॉल्टविना सलग तीन वर्ष हप्ता भरलेला असणे गरजेचे आहे. पॉलिसीवर कर्ज मिळते की नाही, हे देखील जाणून घ्यावे. पॉलिसीच्या कालावधीदरम्यान आपण अनेकदा कर्ज घेऊ शकतो.

कागदपत्राची झंझट नाही – पर्सनल कर्जासाठी आपल्याला सॅलरी स्लिप, रहिवासी प्रमाणपत्र, पॅनकार्डसह अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. त्यात समानता असणे गरजेचे असते. अर्थात पॉलिसीवर कर्ज घेताना एकही कागद देण्याची गरज भासत नाही. आपल्याला केवळ पॉलिसीचे मूळ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

– मिथिला शौचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)