विमा कंपन्यांकडे 15 हजार 167 कोटी रूपये बेवारस पडून

नवी दिल्ली: विमा कंपन्यांकडे देशभरातील नागरीकांचे तब्बल 15 हजार 167 कोटी रूपये बेवारस पडून आहेत. अनक्‍लेम्‌ड मनी म्हणून ही रक्कम ओळखली जाते. या रकमेवर दावा सांगण्यास कोणीच पुढे आलेले नाही त्यामुळे हे पैसे बेवारस ठरले आहेत. इआरडीएआयच्या बैठकीत ही आकडेवारी सादर करण्यात आली आहे.
या पंधरा हजार 167 कोटी रूपयांपैकी सार्वजनिक क्षेत्रातील एआयसी कंपनीकडे सर्वाधिक म्हणजे 10 हजार 509 कोटी रूपये बेवारस पडून आहेत. तर अन्य 22 विमा कंपन्यांकडे 4 हजार 657 कोटी रूपये बेवारस पडून आहेत. या सर्व विमा कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर सर्च सुविधा उपलब्ध करून द्यावी, ज्या योगे संबंधीत व्यक्तींना अथवा त्यांच्या वारसांना त्यांची रक्कम बेवारस अवस्थेत आहे किंवा कसे याचा शोध घेता येईल अशी सुचना विमा नियामक मंडळाने सर्व विमा कंपन्यांना केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)