विमासंरक्षणामुळे माथाडी कामगारांमध्ये सुरक्षिततेची भावना : अविनाश घुले 

नगर – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून अत्यावश्‍यक सेवा असलेल्या अन्न-धान्य, भाजीपाला तसेच इतर अनेक गोष्टी राज्यभर पुरविण्यासाठी माथाडी कामगार यांनी मोठी महत्वपूर्ण भुमिका बजावली. परंतु, हे करत असतांना करोनाची लागण झाल्यास आरोग्य सेवा व विमा संरक्षण मिळणे गरजेचे होते.

त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन, माथाडी यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मंजुर करुन घेतले. त्यामुळे राज्यातील माथाडी कामगार यांना आपले काम करतांना सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

हमाल-मापाडी यांना शासनाच्यावतीने 50 लाखांचे विमा संरक्षण मंजूर करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावणारे जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांचा भुसार विभागातील माथाडी कामगारांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अंबादास पंधाडे, हमाल पंचायतचे उपाध्यक्ष गोविद सांगळे, सचिव मधुकर केकाण, सुनिल गिते, पांडुरंग चक्रनारायण, वाल्मिक सांगळे, नवनाथ बडे, राहुल घोडेस्वार आदी उपस्थित होते.

घुले म्हणाले, कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्वाचे होते. करोनाच्या काळात काही दिवस बंद असल्याने माथाडी कामगांराना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करुन 5 हजार रुपयांची मदत माथाडी कामगार मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. यावेळी बहिरू कोतकर, सतीश शेळके, बाळासाहेब वडागळे, अनुरथ कदम, नारायण गिते, केशव सान ,लक्ष्मण वायभासे, नंदू डहाणे, डॉ.विजय कवळे आदी कामगार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.