विमान प्रवाशांची संख्या रेल्वेच्या एसीपेक्षा अधिक

नवी दिल्ली – देशात रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्यांपेक्षा विमान प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर हवाई बाजारपेठेबाबत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात गेल्या तीन वर्षात हवाई प्रवासी संख्या वाढीत 18-20 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली. सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार एसी रेल्वेपेक्षा विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या पहिल्यांदाच वाढली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयानुसार, पुढील 15 ते 20 वर्षात हवाई प्रवाशांच्या संख्येत वार्षिक पाच पटीने वाढ होण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

याव्यतिरिक्त पुढील दशकभरात या क्षेत्रातील कंपन्यांकडून 1 हजारपेक्षा अधिक विमानांची खरेदी करण्यात येईल असा अंदाज आहे. 2017 मध्ये देशातील विमान प्रवाशांची संख्या 10 कोटी पलीकडे पोहोचली आहे. देशातील हवाई क्षेत्रात जास्तीत जास्त विमान प्रवाशांचा समावेश व्हावा यासाठी नॅशनल सिव्हिल एव्हिएशन पॉलिसी 2016 लागू करण्यात आले आहे. यानुसार लहान शहरांत विमान सेवा देण्यासाठी उडाण योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना यशस्वी ठरल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी विमानतळांच्या पायाभूत सुविधांसाठी आढावा घेण्यात येईल आणि व्हिजन 2025 साठी पुढील निर्णय घेण्यात येतील. देशातील विमान सेवा, विमानतळांची क्षमता पूर्णपणे वापरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)