विमानाला पाच तास उशीर : प्रवाशांनी जमिनीवरच अंथरला बाडबिस्तारा

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांचे हाल

पुणे – पुण्याहून बंगळुरूला जाणारे एअर इंडिया कंपनीचे विमान पाच तास उशिरा येणार असल्याचे अचानक जाहीर केल्याने रविवारी (दि.23) पहाटे लोहगाव विमान तळावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एअरपोर्ट प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना रात्री दीड वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. एवढेच नव्हे तर पाच-सहा तास लागणार असल्याने प्रवाशांनी विमानतळावर जमिनीवरच कागदाची पथारी पसरून झोपणे पसंत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविवारी पहाटे 1.25 च्या विमानाने पुण्याहून बंगळुरूला जाण्यासाठी पुणे-बंगळुरू “एअर गो’ विमानाची प्रतिक्षा करत वेळेआधी दोन तास चेकइनसाठी प्रवासी विमानतळावर जमले होते. वेळेत विमान येणार असे आधी जाहीर झाल्याने गेट नंबर सात जवळ प्रवासी येऊन थांबले होते. त्यावेळी एअरपोर्ट प्रशासनाने ते विमान पाच तास उशिरा येणार असल्याचे अचानक जाहीर केले. त्यावेळी संतापलेल्या प्रवाशांनी व्यवस्थापक सय्यद यांना विचारणा केली. त्यावर तांत्रिक बिघाडामुळे विमान उशिरा येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांना रात्री दीड वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत संपूर्ण रात्र विमानतळावर काढली. पाच तास उशीर होणार असल्याने घरी जाण्यापेक्षा प्रवाशांनी विमानतळावरच जमीनीवर कागदाची पथारी पसरली आणि तेथेच झोपणे पसंत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)