विमानांसाठी जैवइंधनाची चाचपणी सुरू

नवी दिल्ली: स्पाईसजेट कंपनीकडून लवकरच जैवजेट इंधनाची चाचणी करण्यात येणार आहे. बायोजेट फ्युएलच्या माध्यमातून हवाई सेवा देणारी ती देशातील पहिली कंपनी ठरणार आहे. या चाचणीला सरकारकडून अधिकृत मंजुरी देणे बाकी आहे. 27 ऑगस्टला कंपनीकडून बायोजेट फ्यूएलच्या माध्यमातून विमान उड्डाणाची चाचणी करण्यात येणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. 24 फेब्रुवारी 2008 रोजी बायोजेट फ्यूएलचा वापर करत विमानाने उड्डाण केले होते. वर्जिन अटलांटिकच्या विमानाने बायोजेट फ्यूएलच्या माध्यमातून लंडनच्या हिथ्रो विमानतळापासून ऍमस्टरडॅमपर्यंत प्रवास केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)