विमाननगरमध्ये टोइंगवाल्यांची दादागिरी; वाहनचालक त्रस्त 

वडगावशेरी – विमाननगर भागात टोइंनवाल्यांची दादागिरीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. टोइंनवाल्यांच्या दादागिरीला पोलिसांनी आवर घालावा, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

विमाननगर भागात अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जातात. त्यावर ट्रॅफिक विभाग कारवाई ही करते. मात्र, ठराविक ठिकाणी गाड्या टोइंग केल्या जातात. त्या गाड्या इतक्‍या चुकीच्या पद्धतीने व ओव्हर लोड केल्या जातात म्हणजे नियम शिकवता शिकवता ट्रॅफिक विभागचा नियम पळत नाही किंवा नियम टोइंग करतात, असेच म्हणता येईल. या भागात अनेक ठिकाणी सम व विषम पार्किंगसाठी रस्त्याच्या बाजूला सुविधा केलेल्या आहेत. या भागात नागरिकांचा वाहनांचा लोड जास्त असल्याने या भागात येणाऱ्या नागरिकांनी संख्या जास्त आहे. त्यामुळे वाहन पार्क करणे ही अवघड होते. त्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहन पार्क करतात आणि त्याचा फायदा टोइंग करणारे टोइंग बॉय घेतात. बऱ्याच वेळी टोइंग केलेली वाहनांची सेलमेंट जागेवरच केली जाते. चला बाजूला या बाकीच बोलू त्यात ट्रॅफिक पोलीस टेम्पोमध्ये बसलेला असतो आणि टोइंग बॉय देणे घेण्याचे बोलतात. त्यामुळे आम्ही विरोध केला तर गाडी ट्रॅफिक विभागात येऊन घेऊन जा आणि तिथे आल्यावर अजून कोणकोणते खटले भारतात त्याला सामोरे जा, असा सज्जन दम देतात असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. गाड्या टोइंग करणारे बॉय वाईट भाषेचा वापर करतात. त्यामुळे वाहनचालक त्यांना बोलायला ही घाबरतात. आशावेळी कोणाकडे दादा मागायची? असा प्रश्‍न वाहनचालकांना पडतो.

कारवाई पारदर्शक झाली पाहिजे
टोइंग केलेल्या गाड्या किंवा अनधिकृतपणे गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पण त्याची पूर्ण व्हिडिओ शूटिंग झाले पाहिजे. त्यामुळे कारवाई पारदर्शक होईल. या संदर्भात मुख्य ट्रॅफिक विभागाकडे पत्रव्यवहार करून ही मागणी करणार असल्याचे मनसेचे सोहित बनकर यांनी सांगितले.

एकेरी वाहतूक पुन्हा बंद
सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जगताप यांनी वि.एन.आर.ए यांच्या कडून वाहतूक कोंडीवर एकेरी वाहतूक करण्याचा एक प्रयोग केला होता. मात्र, त्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले तरी प्रायोगिक तत्ववार काही महिने हा प्रयोग चालू ठेवण्यात आला. त्यातून वाहतूक कोंडी बऱ्या पैकी कमी झाली होती. मात्र सध्या एकेरी वाहतूक पुन्हा बंद केल्याने विमाननगर हे वाहतूक कोंडीचे ठिकाण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.