विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद

टीम ऐम स्पोर्टस ऍकेडमी ः पर्यावरण संवर्धन व मुलगी वाचवाचा संदेश
नगर – टीम एम स्पोर्टस ऍकेडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. वाऱ्याशी स्पर्धाकरत स्केटिंगच्या सहाय्याने धावणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तर स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व मुलगी वाचवाचा संदेश देण्यात आला. उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात खेळाडूंना दाद दिली.
भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या प्रोफेशनल ट्रॅकवर घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी एस.पी. न्युट्रीशियनचे संचालक सचिन पारधे, महाराष्ट्र स्केटिंग संघाचे प्रशिक्षक मनोज करपे, प्रशिक्षक अमर लोंढे (जालना), ज्ञानेश्‍वर भोत (संगमनेर), सतीश गायकवाड, टीम ऐमचे सचिव प्रमोद डोंगरे आदि उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करीत या वर्षीचे नॅशनल खेळाडूंना रोप देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र सब ज्युनिअर संघाचा कर्णधार आदित्य मरकड, श्री वाघ, वेदांत गर्जे, आर्य कुक्कडवाल, आदेश पालवे, इशांत रहाणे, आर्यन बांदल, उदयनराजे भोसले, ओमकार कराळे, मुलींच्या संघाची कर्णधार आयुषा रहाणे, वरिष्ठ संघाचा कर्णधार शुभम करपे, तुषार चेमटे, शुभांगी पालवे यांचा सत्कार झाला. या स्पर्धेसाठी एस.पी. न्युट्रीशियनचे प्रायोजकत्व लाभले. जालना, संगमनेर, पाथर्डी आदिंसह जिल्ह्यातील 81 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. विविध वयोगटात घेण्यात आलेली स्केटिंग स्पर्धा कॉड, इनलाईन व टेनासिटी या प्रकारात झाली. या स्पर्धेसाठी प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे संस्थापक बाळासाहेब खोमणे सर यांनी शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)