विभागीय क्रीडा संकुल जलतरण तलावप्रश्नी आयआयटीची नियुक्ती – विभागीय आयुक्त

कोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण व डायव्हींग तलावाच्या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी आयआयटी मुंबई या संस्थेची नियुक्ती केली असून लवकरच आयआयटीच्या टिमकडून सर्व्हे करुन यांच्या सल्ल्यानुसार क्रीडा संकुलातील जलतरण व डायव्हींग तलावातील कामे हाती घेतली जातील, असे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज येथे बोलतांना सांगितले.
विभागीय क्रीडा संकुलाच्या कामकाजाचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहुजी सभागृहात घेतला, त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होतेक्रीडा संकुलातील जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या दृष्टिने आवश्यक सर्व बाबी पडताळून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास प्राधान्य्‍ दिले असल्याचे सांगून  विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, जलतरण व डायव्हींग तलावाच्या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी आयआयटी मुंबई यांची नियुक्ती केली असून त्यांच्या सल्यानुसार पुढील कामकाज केले जाईल.
श्रीक्षेत्र जोतिबा विकास आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यातील मंजूर 5 कोटीच्या निधीतून दर्शनी मंडप  व टॉयलेट कॉम्प्लेक्स उभारणीची सर्व प्रक्रीया जुलै अखेर पूर्ण करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज येथे बोलताना केली.
श्री महालक्ष्मी (करवीर निवासीनी अंबाबाई) मंदिर परिसर विकास आराखड्यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला. श्री महालक्ष्मी (करवीर निवासीनी अंबाबाई) मंदिर परिसर विकासाचा 87 कोटीचा आराखडा तांत्रिक बाबी तपासून शासनाकडे सादर करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सांगितले. यावेळी श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखड्यांतर्गत 25 कोटीच्या आराखड्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याबरोबरच परस्पर समन्वय राखून समयबध्‌द कार्यक्रमाव्दारे कामे करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केली. यावेळी त्यांनीपंचगंगा नदी प्रदुषणासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
यावेळी महसूल विभागाकडील विविध कामकाजाचाही विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सविस्तरपणे आढावा घेतला. महसूल अधिकाऱ्यांनी 7/12 संगणकीरणाचे काम अधिक गतीने करुन लवकरच जनतेस डिजिटल स्वाक्षरीसह 7/12 उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)