विनानिविदा कोटी-कोटी उड्डाणे

पिंपरी – थेट पद्धतीने मुदतवाढ, वाढीव खर्च तसेच कोट्यावधींच्या कामाला थेट मंजुरी देण्याची स्थायी समितीची परंपरा कायम राखत स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. 27) होणाऱ्या बैठकीतही केवळ पिंपरी प्रभागात स्वच्छतागृह बांधण्यासाठी तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा थेट पद्धतीने काम देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

महापालिकेकडून प्रभाग क्रमांक 21, पिंपरीमध्ये स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. त्यावर सुमारे 1 कोटी 77 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोणतीही निवीदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने हे काम करण्याचा घाट घालण्यात आला आहे. सुलभ इंटरनॅशनल सोशियल सर्व्हिस ऑर्गनायजेशन या संस्थेला या कामाचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव  स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये पिंपरी परिसरात एकूण 27 शौचालये तर 12 मुतारी यांच्या बांधकाम यांचा समावेश आहे. येथील अयप्पा मंदिराजवळ महिला व पुरुष यांचे चार शौचालय, दोन मुतारी, राधिका चौक दोन शौचालय, 1 मुतारी, पीसीएमसी क्वार्टर्स नऊ शौचालय व 4 मुतारी, पिंपरीगाव बसस्थानक नऊ शौचालय व 4 मुतारी, शिवसक्ती माता मंदिरामागे 4 शौचालय व 2 मुतारी असे 27 शौचालय व 12 मुतारी यांच्या बांधकामासाठी महापालिका 1 कोटी 77 लाख 6 हजार 665 रुपयांचा खर्चाचा ठराव मांडण्यात आला आहे. ही शौचालये वापरण्यासाठी दोन रुपयांचा शुल्क आकारण्यात येणार आहे. ही निविदा प्रक्रिया थेट पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या ठरावावर महापालिका कोणता निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या आधीही स्थायी समितीसमोर स्मार्ट वॉच खरेदीचा 7 कोटीचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता. मात्र, त्याला प्रचंड विरोध झाल्याने हा ठराव रद्द करण्यात आला. याबरोबरच रावेत बंधाऱ्याच्या ड्रोन सर्वेक्षणाचा प्रस्ताव अशाच पद्धतीने आला. सुमारे पाच लाख खर्चाचे काम थेट पद्धतीने दिले जाणार होते. यावर अंतिम निर्णय प्रलंबित आहे. याबरोबरच निविदा न काढता जुन्याच दोन ठेकेदारांना साफसफाईचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. चार महिन्यांसाठी हे काम दिले जाणार असून त्यावर दीड कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. शहरातील पाण्याच्या टाकीचे “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ करण्यासाठीही स्थायी समितीने थेट पद्धतीने 45 लाख रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. सत्ता बदलली तरी विनानिविदा कंत्राट देणे, वाढीव खर्चाचे प्रस्ताव मंजूर करणे असा कारभार सुरू आहे. ठेकेदार पोसण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीला सुरूंग लावला जात असल्याचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)