विधी सेवा कक्षाचा उपयोग करून घ्या

राजगुरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश सलगर : दावडीत कायदेविषयक शिबिर

राजगुरुनगर- खेड तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून राजगुरुनगर येथील न्यायालयात विधी सेवा कक्ष सुरू करण्यात आला आहे. याद्वारे नागरिकांना मोफत कायदेविषयक माहिती देण्यात येत आहे. त्याचा उपयोग नागरिकांनी करून घ्यावा, असे आवाहन राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सलगर यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती खेड, खेड बार असोशिअशन, दावडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे दावडी येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सलगर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश के.एच. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश एस. सी. तायडे, कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष वाय. जे. तांबोळी, कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एच. डी. देशिंगे, पी. डी. देवरे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, तालुका बार असोशिअशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे, उपाध्यक्ष ऍड. कृष्णा भोगाडे, विधी न्याय सेवा समितीचे महादेव कानकुरे, पंचयात समिती सदस्या वैशाली गव्हाणे, सरपंच वंदना सातपुते, संतोष गव्हाणे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. पोपटराव तांबे, ऍड. बी. एम. सांडभोर, ऍड. अरुण मुळूक, ऍड. अनिल राक्षे, ऍड. सुभाष कड, ऍड.व्ही. व्ही. मेदनकर, ऍड. अमोल घुमटकर, ऍड. अमोल वाडेकर, ऍड. संदीप रेटवडे, ऍड. देविदास शिंदे, ऍड. अनिल वाडेकर, ऍड. योगेश मोहिते, ऍड. गणेश गाडे, ऍड. गोपाळ शिंदे, ऍड. मनीषा टाकळकर, ऍड. मोहिनी केदारी, ऍड. अश्‍विनी पानसरे, ऍड. स्वाती आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
वाय. जे. तांबोळी म्हणाले की, कायद्याचे सर्वांना ज्ञान व्हावे, कायद्याची जाण राहावी यासाठी देश राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर विधी न्याय समिती काम करीत असते. आपल्या देशात विविध प्रकारचे कायदे आहेत, त्यांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळण्यासाठी विधी सेवा समिती काम करीत आहेत, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. माणिक वायाळ, तर ऍड. कृष्णा भोगाडे यांनी आभार मानले.

  • विद्यार्थीदशेपासून कायद्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न आहे. समता स्वतंत्र आणि बंधुता याबरोबर आपले हक्क आणि अधिकार घटनेने आपल्याला मिळाले आहेत. त्यांचा योग्य वापर केला पाहिजे, नैतिक स्वातंत्र्याचा आपणाला जसा अधिकार आहे तसाच तो कोणाच्या हक्कांवर बाधा येणार नाही यासाठी आपण कायद्याचे निर्बंध पाळणे गरजेचे आहे. कायद्याच्या ज्ञानाचा दिवा घरोघरी लावला पाहिजे तरच आपल्यातील अज्ञान दूर होईल आणि जबाबदारीचे भान ठेवले जाईल.
    – एस. सी. तायडे, दिवाणी न्यायाधीश

Leave A Reply

Your email address will not be published.