विद्युत तारांना वेलींचा वेढा

सातारा : गिरीजा हॉस्पिटल ते सातारा तालुका पोलीस ठाणे दरम्यानच्या मार्गावरील विद्युत तारांवर वाढलेल्या वेली. (छाया : संजय कारंडे)

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी) – विद्युत तारांना प्लास्टिकचे आवरण सर्वांनीच पाहिले असेल. परंतु, सध्या शहरातील विद्युत तारांवर हिरव्यागार वेली पसरल्यामुळे या तारांना जणूकाही वेलीचाच कव्हर तयार करण्यात आला आहे की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, तारांवर पसलेल्या या वेली एखाद्या दुर्घटनेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या तारांवरील वेली काढण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.
पावसामुळे धरणीमातेने हिरवा शालू पांघरला आहे. ग्रामीण भागासह शहरानजीक असणारा डोंगर परिसर निसर्गाच्या सौंदर्याने अक्षरश: खुलून दिसू लागला आहे. त्याचबरोबर शहरात उभारण्यात आलेल्या वीजेच्या खांबांनाही हिरव्यागार वेलींनी वेढा दिला आहे. अनेकठिकाणचे खांब पूर्णपणे वेलींनी झाकोळले आहेत. त्यामुळे याठिकाणी विद्युत खांब आहे की वृक्ष हेच रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या लक्षात येत नाही. आधी खांब व्यापणाऱ्या या वेली आता तारांवरही पसरू लागल्या आहेत. मात्र, यामुळे दोन वेगळ्या तारांचे परस्पर घर्षण होऊन शॉर्टसर्किटसारख्या घटनाही घडू शकतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित विभागाने तातडीने या तारांवरील वेली काढणे आवश्‍यक झाले आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)