बारामतीतील एका शाळेतील घटना
बारामती- शहरातील एका माध्यमिक विद्यालयातील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने बारामती शहर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.1) फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. शहरातील एका माध्यमिक विद्यालयामधील स्वच्छतागृहामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेतील दोघा आरोपी विद्यार्थ्यांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबांधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पीडिअल्पवयीन मुलगी त्याच शाळेत शिक्षण घेत आहे. या हायस्कूलमध्ये हे आरोपी विद्यार्थीही शिकतात. ते या मुलीच्या ओळखीचे आहेत. यापैकी एकाने हायस्कूलच्या आवारातील स्वच्छतागृहामध्ये या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तर या आरोपीला अन्य एका विद्यार्थ्याने मदत केल्याची तक्रार या विद्यार्थिनीने केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आश्विनी शेंडगे करत आहेत.